खांद्याला बॅग, हातात पिशव्या; पिकनिक स्पॉटवर संतोषची अवस्था पाहून कुशल बद्रिकेला हसू आवरेना, म्हणतो... 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 02:47 PM2024-09-04T14:47:47+5:302024-09-04T15:13:31+5:30

नुकताच कुशल ब्रद्रिकेने आपल्या मित्रांसोबतचा पिकनिक स्पॉटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

marathi actor kushal badrike share picnic video of santosh juvekar abhijeet chavan and viju mane netizens react  | खांद्याला बॅग, हातात पिशव्या; पिकनिक स्पॉटवर संतोषची अवस्था पाहून कुशल बद्रिकेला हसू आवरेना, म्हणतो... 

खांद्याला बॅग, हातात पिशव्या; पिकनिक स्पॉटवर संतोषची अवस्था पाहून कुशल बद्रिकेला हसू आवरेना, म्हणतो... 

Kushal Badrike Share Picnic Video: कुशल ब्रद्रिके मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. कुशल ब्रद्रिके हा सोशल मीडियावर कायमच चर्चेत येत असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स  तसेच प्रोजेक्टबद्दल माहिती तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असतो. उत्तम अभिनय आणि विनोदी शैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. कुशलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांच लक्ष वेधलं आहे.


मराठी कलाविश्वात अभिनयाव्यतिरिक्त काही कलाकार त्यांच्या मैत्रीच्या बॉंडिंगसाठी ओळखले जातात. असाच सर्वाधिक चर्चेत असणारा मित्रांचा ग्रुप म्हणजे अभिनेता कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण आणि विजू माने यांचा आहे. हे चौघेजण एकमेकांचे जिगरी यार आहेत. याची प्रचिती चाहत्यांना अनेकदा येते. 

सध्या या चार मित्रांची टोळी आपल्या कामातून थोडा ब्रेक घेत मॉन्सून व्हेकेशनसाठी गेली आहे. एका फार्म हाऊसमध्ये हे चार मित्र जमले आहेत. नुकताच कुशलने या तीन मित्रांसोबतचा पिकनिक स्पॉटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा मजेशीर व्हिडीओ पाहून नेटकरी देखील लोटपोट हसत आहेत. व्हिडीओमध्ये संतोष जुवेकर भर पावसात खांद्याला बॅगा तसेच हातात पिशव्या घेऊन जाताना दिसत आहेत. आपल्या मित्राची ही अवस्था पाहून कुशल ब्रद्रिकेला हसू आवरत नाही. 

कुशल बद्रिकेने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्रामवर आपल्या मित्रांसोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहलंय, "पिकनिकमध्ये एक मित्र तरी असा असतोच जो कायम सगळ्यांची काळजी घेतो. लोकेशन शोधण्यापासून सगळ्यांच्या सामानाची जबाबदारी सुद्धात त्याच्यावर येते. आमच्यात ती भूमिका पार पाडणारा संतोष आहे". कुशल बद्रिकेने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये संतोष जुवेकर सामान आणण्यासाठी मोठी कसरत करताना दिसत आहे. तर कुशलने  त्याची मदत करण्याची खेचताना दिसतोय. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे.

Web Title: marathi actor kushal badrike share picnic video of santosh juvekar abhijeet chavan and viju mane netizens react 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.