डर के आगे जीत है! हिंदी कॉमेडी शोबाबत कुशलची पोस्ट, म्हणतो- "चौकटी बाहेर पडून काम करायला भीती..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 09:41 AM2024-06-13T09:41:59+5:302024-06-13T09:42:19+5:30

. मराठी मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारा कुशल सध्या हिंदी कॉमेडी शोमधून मनोरंजन करत आहे. 'मॅडनेस मचाऐंगे इंडिया को हसाऐंगे' या शोच्या मंचावरील फोटो कुशलने शेअर केले आहेत.

marathi actor kushal badrike shared madness machayenge comedy show post said dar ke aage jeet hai | डर के आगे जीत है! हिंदी कॉमेडी शोबाबत कुशलची पोस्ट, म्हणतो- "चौकटी बाहेर पडून काम करायला भीती..."

डर के आगे जीत है! हिंदी कॉमेडी शोबाबत कुशलची पोस्ट, म्हणतो- "चौकटी बाहेर पडून काम करायला भीती..."

कुशल बद्रिके हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. उत्तम अभिनय आणि विनोदीशैलीच्या जोरावर कुशलने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या कुशलने अपार मेहनत आणि कष्टाच्या जोरावर स्वत:ची ओळख बनवली. कुशल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील माहिती तो चाहत्यांना पोस्टद्वारे देत असतो. 

अनेकदा कुशलच्या पोस्टही चर्चेचा विषय असतो. आतादेखील त्याने अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. मराठी मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारा कुशल सध्या हिंदी कॉमेडी शोमधून मनोरंजन करत आहे. 'मॅडनेस मचाऐंगे इंडिया को हसाऐंगे' या शोच्या मंचावरील फोटो कुशलने शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने पोस्ट लिहिली आहे. "खरं सांगू का? चौकटी बाहेर पडून काम करायला खूप भीती वाटते. पण ते म्हणतात ना...डर के आगे जीत है! ते उगाच नाही…स्वतःला शोधायचं म्हणजे चौकट सोडावीच लागते कधी घराची कधी कामाची कधी प्रेमाची…", असं कुशलने पोस्टमध्ये म्हटलं आहे. कुशलच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

'चला हवा येऊ द्या' या शोमधून कुशल घराघरात पोहोचला. या शोमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. त्याने अनेक सिनेमांमध्येही विविधांगी भूमिका साकारून अभिनयाची छाप पाडली. 'जत्रा', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'बायोस्कोप', 'रंपाट', 'हुप्पा हुय्या', 'माझा नवरा तुझी बायको' अशा सिनेमांमध्ये कुशल महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसला. 

Web Title: marathi actor kushal badrike shared madness machayenge comedy show post said dar ke aage jeet hai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.