बिकिनी गर्लबरोबर फोटो टाकणं महागात पाडलं, कुशलला बायकोने घडवली अद्दल, आता म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 12:24 PM2024-08-31T12:24:02+5:302024-08-31T12:24:43+5:30

बिकिनी गर्लबरोबर कुशलचे फोटो पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले होते. पण, बिकिनी गर्लबरोबर असे फोटो टाकणं कुशलला चांगलंच महागात पडलं आहे. कुशलला त्याच्या पत्नीने अद्दल घडवली आहे. 

marathi actor kushal badrike wife reaction after he shared bikini girl photos | बिकिनी गर्लबरोबर फोटो टाकणं महागात पाडलं, कुशलला बायकोने घडवली अद्दल, आता म्हणतो...

बिकिनी गर्लबरोबर फोटो टाकणं महागात पाडलं, कुशलला बायकोने घडवली अद्दल, आता म्हणतो...

'चला हवा येऊ द्या' या शोमधून घराघरात पोहोचलेला आणि अफलातून विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा कुशल बद्रिके मराठी सिनेसृष्टीतील लाडका अभिनेता आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या कुशलने अपार मेहनत आणि कष्टाच्या जोरावर स्वत:ची ओळख बनवली. कुशलचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील माहितीही तो चाहत्यांना पोस्टद्वारे देत असतो. 

कुशलने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन बिकिनीतील मुलींसोबत काही फोटो शेअर केले होते. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. बिकिनी गर्लबरोबर कुशलचे फोटो पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले होते. या फोटोला त्याने  "काहीतरी नवीन करतोय शुभेच्छा असू द्या", असं कॅप्शन दिलं होतं. पण, बिकिनी गर्लबरोबर असे फोटो टाकणं कुशलला चांगलंच महागात पडलं आहे. कुशलला त्याच्या पत्नीने अद्दल घडवली आहे. 


कुशलने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केलेले फोटो हे शूटिंग सेटवरचे होते. या फोटोंमध्ये लाईट्स आणि कॅमेरेही दिसत होते. आता कुशलने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. यामध्ये तो आणि दिग्दर्शक विजू माने दिसत आहेत. "नमस्कार, काल मी एक पोस्ट केली होती. पण, काही तांत्रिक अडचणींमुळे तो सिनेमा मी करू शकत नाही. या सिनेमाचे दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते विजू माने असणार होते. पण, काही कारणांमुळे तेदेखील हा सिनेमा करत नाहीयेत", असं कुशल आणि विजू माने म्हणत आहेत. नंतर या व्हिडिओत त्या दोघांच्याही पत्नी दिसत आहेत. कुशलच्या या मजेशीर व्हिडिओवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. 


दरम्यान, यानिमित्ताने कुशल काहीतरी नवीन प्रोजेक्ट घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. कुशलला'चला हवा येऊ द्या' या शोने कुशलला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. 'मॅडनेस मचाऐंगे' या हिंदी कॉमेडी शोमध्येही तो दिसला होता. या शोमधून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 'जत्रा', 'पांडू', 'डावपेच', 'भिरकीट', 'रंपाट', 'बापमाणूस', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'माझा नवरा तुझी बायको' यांसारख्या सिनेमात त्याने काम केलं आहे. 

Web Title: marathi actor kushal badrike wife reaction after he shared bikini girl photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.