'आपलं वय कितीही वाढलं तरी...'; आईसाठी कुशल बद्रिकेची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 03:39 PM2024-05-12T15:39:01+5:302024-05-12T15:39:23+5:30

Kushal badrike: कुशलने इन्स्टाग्रामवर आईचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या मॅडनेस मचायेंगे या कार्यक्रमातील आहे.

marathi actor Kushal Badrike's emotional post for mom on mothers day | 'आपलं वय कितीही वाढलं तरी...'; आईसाठी कुशल बद्रिकेची भावुक पोस्ट

'आपलं वय कितीही वाढलं तरी...'; आईसाठी कुशल बद्रिकेची भावुक पोस्ट

आज संपूर्ण जगभरात मातृदिन अर्थात मदर्स डे साजरा केला जात आहे. त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत अनेक जण त्यांच्या आईसोबत हा खास क्षण साजरा करत आहेत. काही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून या दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तर, काही जण आईच्या आठवणी शेअर करत आहेत. यामध्येच अभिनेता कुशल बद्रिके (kushal badrike) याने त्याच्या आईसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

कुशलने इन्स्टाग्रामवर आईचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या 'मॅडनेस मचायेंगे' या कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात मदर्स डे सेलिब्रेट करण्यात आला. ज्यात कुशलच्या आईने त्याच्या बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या. हा व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

"आपलं वय कितीही वाढलं तरी आईच्या डोळ्यात “आपलं बालपण” कायम तरंगताना दिसतं. “mother’s Day” च्या निमित्ताने आमच्या “मॅडनेस मचायेंगे” हया कार्यक्रमात, आम्हाला surprise दिलं गेलं. त्यातला माझ्या आईचा हा video.Happy Mother’s Day to all", असं म्हणत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान, 'चला हवा येऊ द्या'नंतर कुशल आता 'मॅचनेस मचाएंगे' या हिंदी रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात त्याच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी आणि गौरव मोरेदेखील दिसून येत आहे.

Web Title: marathi actor Kushal Badrike's emotional post for mom on mothers day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.