मिलिंद गवळींच्या रिअल लाइफ मुलीला पाहिलं का? पहिल्यांदाच शेअर केला बाप-लेकीचा खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 12:53 PM2022-06-05T12:53:07+5:302022-06-05T12:53:43+5:30

Milind gawali: मिलिंद गवळी यांच्या लेकीचं नाव मिथिला असं आहे. मिथिलाचं लग्न झालं असून आता तिचं कदम आडनाव आहे.

marathi actor milind gawali real life daughter photo viral on social media | मिलिंद गवळींच्या रिअल लाइफ मुलीला पाहिलं का? पहिल्यांदाच शेअर केला बाप-लेकीचा खास व्हिडीओ

मिलिंद गवळींच्या रिअल लाइफ मुलीला पाहिलं का? पहिल्यांदाच शेअर केला बाप-लेकीचा खास व्हिडीओ

googlenewsNext

मिलिंद गवळी हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. असंख्य चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सध्या आई कुठे काय करते या मालिकेत के अनिरुद्ध ही भूमिका साकारत असून त्यांनी अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. या मालिकेत अनिरुद्धचं  त्याच्या लेकीवर इशावर किती प्रेम आहे हे साऱ्यांनीच पाहिलं. मात्र, पहिल्यांदाच अनिरुद्धने म्हणजेच मिलिंद गवळी यांनी त्यांच्या रिअल लाइफ लेकीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अलिकडेच मिलिंद गवळी यांच्या लेकीचा वाढदिवस झाला. या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक छानसा व्हिडीओ शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या व्हिडीओमध्ये मिलिंद गवळी यांनी त्यांच्या मुलीच्या बालपणापासून ते आतापर्यंतच्या फोटोंपर्यंतचा कोलाज तयार केला होता. यात आपली लेक लहानाची कशी मोठी झाली हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला.

दरम्यान, मिलिंद गवळी यांच्या लेकीचं नाव मिथिला असं आहे. मिथिलाचं लग्न झालं असून आता तिचं कदम आडनाव आहे. ही पोस्ट शेअर करत मिलिंद गवळी यांनी आपल्या लेकीच्या जन्माच्यावेळची घटनाही सांगितली आहे. एक बाप होणं म्हणजे नेमकं काय हे त्यांनी या पोस्टमधून सांगायचा प्रयत्न केला आहे.

Web Title: marathi actor milind gawali real life daughter photo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.