'आपल्या देशात अजूनही गायींची काळजी घेतली जात नाही'; अभिनेत्याने केली मार्मिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 03:23 PM2023-04-03T15:23:02+5:302023-04-03T15:23:39+5:30

Marathi actor: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा अभिनेता कायमच चर्चेत राहत असतो.

marathi actor milind gawali share special post about cow | 'आपल्या देशात अजूनही गायींची काळजी घेतली जात नाही'; अभिनेत्याने केली मार्मिक पोस्ट

'आपल्या देशात अजूनही गायींची काळजी घेतली जात नाही'; अभिनेत्याने केली मार्मिक पोस्ट

googlenewsNext

मिलिंद गवळी (Milind gawali) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही मराठी प्रेक्षकासाठी नवीन नाही. आई कुठे काय करते या मालिकेतून मिलिंद यांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली. उत्तम अभिनयाच्या जोरावर ते अल्पावधीत लोकप्रिय झाले. मिलिंद गवळी कलाविश्वासोबतच सोशल मीडियावरही सक्रीय आहेत. त्यामुळे ते त्यांच्या जीवनात घडणाऱ्या अनेक घटना, किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात अलिकडेच त्यांनी गायींविषयी एक पोस्ट शेअर केली आहे.

“हंबरून वासराले चाटती जवा गाय,तिच्यामंध्ये दिसती मले तवा माझी माय".
काही दिवसांपूर्वी रावेत पुण्याचे श्री रविशंकर सहस्त्रबुद्धे यांच्या गोशाळेत जाण्याचा योग आला, ते भारतामधले प्रख्यात pure breed गीर गाईंच्या जातीचे संशोधक, अभ्यासक आहेतच, आणि त्यांच्या गो शाळेमध्ये शंभरहून अधिक गीर जातीच्या गायी आहेत, अतिशय सुंदर पद्धतीने त्यांच्याकडे त्या गाईंची निगा ठेवली जाते. ते सगळं पाहून मन भारावून गेलं आणि भरूनही आलं, श्रीकृष्णाच्या गोकुळात गेल्यासारखं वाटलं,आणि माझ्या नावातच गवळी आहे, त्यामुळे गाईंच्या सानिध्यात राहणं माझा अधिकारच आहे, कदाचीत म्हणूनच गाईंच्या सानिध्यात माझं मन रमतं, आणि रविशंकर यांसारख्ये व्यक्ती ज्यांना गाईविषयी एवढं ज्ञान आहे, आणि खूप छान पद्धतीने ते गाईंची काळजी घेतात, त्यामुळे त्यांच्याबद्दलचं माझं प्रेम आणि आदर खूप खूप वाढला आहे. त्यांची गोशाळा बघून, त्यांचं ज्ञान जाणवून त्यांच्याबद्दल मला खूप हेवा वाटला, आपण गवळी असून आपल्याला या जन्मात असं काही जमणार नाही याचीही खंत वाटली", असं मिलिंद गवळी म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "त्या आधी एकदा इस्कॉनच्या गोवर्धन आश्रमात जाण्याचा पण योग आला होता, तिथेही गाईंची निगा फार छान पद्धतीने ठेवली जाते, आणि माझा कॉलेजचा मित्र जो आता प्रसिद्ध निर्माता आहे शशांक सोळंकी, त्याने त्याच्या वाड्याला असलेल्या फॉर्मवर गाय पाळली आहे, खरंच मला हेवा वाटतो हा सगळ्या गोष्टींचा. आजच्या काळामध्ये शहरात राहणाऱ्या लाल गाईला घरी आणणं, ही तर अशक्य गोष्ट वाटते, पूर्वीच्या काळी गावात प्रत्येक घरात एक तरी गाय असायचीच, असं म्हटलं जायचं ज्याच्या घरी गाय आहे, त्याच्या घरी मुलं बाळ दुष्काळात पण उपाशी राहणार नाहीत. आपल्या देशामध्ये असं म्हटलं जातं की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात, गाईची पूजा केली जाते, कितीतरी वेळेला माझ्या आईने मला गाईसाठी काढून ठेवलेला नैवेद्य “गाईला भरून ये असं सांगितलं” आणि मी मोटरसायकल वरुन गाय शोधत अनेक वेळेला फिरलेलो आहे. माहींमच्या शितळादेवी मंदिरात गायवाल्या मावशी आणि माझी चांगली ओळखही झाली होती. माझ्या आईची गाईवर खूप श्रद्धा होती.रविशंकरांबरोबर चर्चा करत असताना लक्षात आलं की , आपल्या देशात अनेक ठिकाणी अजूनही गायांची फार काळजी घेतली जात नाही."

दरम्यान, मिलिंद गवळी यांनी गायींविषयी ही पोस्ट करत त्यांच्या मनात मुक्या जनावरांविषयी असलेलं प्रेम दिसून आलं. इतंकच नाही तर सध्यस्थितीला देशातील गायींविषयी त्यांना वाटत असलेली चिंताही स्पष्टपणे दिसून आली.
 

Web Title: marathi actor milind gawali share special post about cow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.