'आता तो अनुभव परत नको वाटतो'; प्रसिद्ध कोरिओग्राफरने मिलिंद गवळींना केलं होतं अपमानित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 04:14 PM2023-06-14T16:14:00+5:302023-06-14T16:15:02+5:30

Milind gawali: मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना आलेला अनुभव सांगितला आहे.

marathi actor Milind Gawli was humiliated by the famous choreographer | 'आता तो अनुभव परत नको वाटतो'; प्रसिद्ध कोरिओग्राफरने मिलिंद गवळींना केलं होतं अपमानित

'आता तो अनुभव परत नको वाटतो'; प्रसिद्ध कोरिओग्राफरने मिलिंद गवळींना केलं होतं अपमानित

googlenewsNext

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) ही मालिका सध्या टीआरपीमध्ये प्रथम स्थानावर आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार चर्चेत येत असतो. ही कलाकार मंडळीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. यात अलिकडेच अनिरुद्धने म्हणजेच अभिनेता मिलिंद गवळी (milind gawali) यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.  या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या डान्स करण्याविषयीचा अनुभव शेअर केला आहे.

प्रयत्नांती / प्रयत्नार्थी परमेश्वर” आपल्या लहानपणापासून आपल्या काही धारणा बनत जातात, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या धारणा मनामध्ये घट्टपणे बिंबवून ठेवल्या जातात, आणि मग आयुष्यभर ते प्रामाणिकपणे त्याचं पालन करत राहतात, उदाहरणार्थ काही लोकांची स्वतःबद्दलची अशी धारणा असते की त्यांना आयुष्यात ड्राइविंग कधीच करता येणार नाही, मग ड्रायव्हिंग करायच्या ते कधी भानगडीतच पडत नाही, मग ड्रायव्हर आला नाही म्हणून त्याच्यासाठी दोन तास थांबणारी लोकही मी बघितले, आणि माझं उलट होत होतं ड्रायव्हर जर पाच दहा मिनिटे उशिरा आला तर मी गाडीत बसायचो आणि shooting लाल निघून जायचो आणि driver ला त्या दिवशी सुट्टीच द्यायचो, कदाचित म्हणुन बिचारे माझे प्रवीण आणि जितेश कधी उशिरा यायचे नाही. पण माझ्या मनामध्ये लहानपणापासून वेगळीच धारणा किवा भिती बसली होती "मला नाचता येत नाही", त्यामुळे लग्नामध्ये वरातीत आणि गणपतीत जसे बिनधास्त नसतात कोणाचं कोणाला काही घेणं देणं नसतं तसा नाच मला येतो पण सिनेमातला नाच हा मला काही जमणार नाही असं माझ्या मनाने ठरवूनच टाकलं होतं आणि त्या पद्धतीनेच मी इतकी वर्ष वावरत होतो. अचानक स्टार प्रवाहने मला perform करायला सांगितलं, दिग्दर्शक वैभव घुगे यांना मी म्हटलं की माझ्या ऐवजी दुसरा कोणीतरी नाचणारा कलाकार घ्या म्हणजे तुमचं काम सोपं होईल, वैभव घुगे म्हणाले की आम्हाला तुम्हीच हवे आहात, मी म्हणालो पण मला नाचता येत नाही, ते म्हणाले ते आम्ही बघून घेऊ, तुम्ही फक्त हो म्हणा, असं मिलिंद गवळी म्हणाले.

पुढे ते लिहितात, जीव मुठीत धरून मी हो म्हटलं, complete घाबरलोच होतो, कारण त्याआधी एका कोरिओग्राफरने मला humiliate केलं होतं. आता तो अनुभव परत नको वाटत. वैभव घुगे स्वतः एवढा विश्वास दाखवतोय म्हटल्यावर, आपण पण प्रयत्न करायला काय हरकत आहे असा विचार करून उतरलो मैदानामध्ये. बघा त्यानंतर तीन वेळा स्टार प्रवाह साठी मी perform केलं आहे. तर माझ्या सांगायचं उद्देश असा हा की ... प्रयत्न केले, आणि correct guide करणारा वैभव घुगे सारखा किंवा अनिल शिंदे सारखा तुम्हाला मिळाला सोहम सारखा तुम्हाला मिळाला तर काहीही अशक्य नाही आहे.आज पर्यंत मला ज्यांनी ज्यांनी नाचवलं त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. सुबल सरकार, नरेंद्र पंडित ,हबीबा, वैभव घुगे, अनिल शिंदे, शिवम वानखडे, कार्तिक पौल ... तुमच्यासारखी माणसं माझ्या आयुष्यात आली नसती तर कदाचित माझे पाय जमिनीवरून वर ऊठले नसते . पण आता आयुष्यात प्रयत्न करायचे असं मी ठरवलेलं आहे. मग जे होईल ते होईल. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा आणि मग बघा गोष्टी तुम्हाला साध्य होतात की नाही. होतीलच हो का नाही होणार.

दरम्यान, मिलिंद गवळी सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय असून कायम ते त्यांच्या आजुबाजूला घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होत असतात. यात बऱ्याचदा ते त्यांच्या वैयक्तिक जीवनात घडून गेलेल्या घटना चाहत्यांसोबत शेअर करतात.
 

Web Title: marathi actor Milind Gawli was humiliated by the famous choreographer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.