नशीबवान! प्रसिद्ध अभिनेत्याने घेतली १०१ वर्षीय आजीची भेट, म्हणाला, "अजूनही आवाज खणखणीत, दात शाबूत.."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 01:56 PM2024-02-20T13:56:44+5:302024-02-20T14:05:11+5:30

संदीप पाठकने नुकतीच त्याच्या १०१ वर्षांच्या आजीची भेट घेतली. आजीची भेट घेतल्याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

marathi actor sandeep pathak shared video of his 101 year old grandmother | नशीबवान! प्रसिद्ध अभिनेत्याने घेतली १०१ वर्षीय आजीची भेट, म्हणाला, "अजूनही आवाज खणखणीत, दात शाबूत.."

नशीबवान! प्रसिद्ध अभिनेत्याने घेतली १०१ वर्षीय आजीची भेट, म्हणाला, "अजूनही आवाज खणखणीत, दात शाबूत.."

अभिनय आणि विनोदाचं परफेक्ट टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा अभिनेता म्हणजे संदीप पाठक. विविधांगी भूमिका साकारून आजवर त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम करत त्याने अभिनयाचा ठसा उमटवला. संदीप सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टची माहिती तो चाहत्यांना देत असतो. याबरोबरच तो अनेक व्हिडिओही शेअर करत असतो. 

संदीप पाठकने नुकतीच त्याच्या १०१ वर्षांच्या आजीची भेट घेतली. आजीची भेट घेतल्याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये संदीपची आजी त्याची विचारपूस करताना दिसत आहे. १०१ वर्षांच्या असूनही त्यांचा आवाज एकदम खणखणीत असल्याचं जाणवत आहे. त्याबरोबरच वयस्कर झाल्याचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर कुठे दिसत नाही. हा व्हिडिओ शेअर करत संदीप म्हणतो, "आमची  'माई'(आईची आई) वय वर्षे १०१...उदगीर ला माई ला भेटायला गेलो, मी आलो हे बघून एवढा आनंद झाला तिला. अजूनही आवाज खणखणीत, दात शाबूत, स्मरणशक्ती तशीच…जुनं ते सोनं...". त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

जितेंद्र जोशीनेही या व्हिडिओवर कमेंट करत "नशीबवान आहेस तू", असं म्हटलं आहे. तर समीर चौघुलेने "वाह वाह..नशीबवान आहेस दादा", अशी कमेंट केली आहे. दरम्यान, संदीप कलर्स वाहिनीवरील 'इंद्रायणी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'वऱ्हाड निघालंय लंडनला' या त्याच्या लोकप्रिय नाटकाचे प्रयोगही सध्या सुरू आहेत. 

Web Title: marathi actor sandeep pathak shared video of his 101 year old grandmother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.