कौतुकास्पद! शंकर महाराजांच्या भूमिकेसाठी संग्राम समेळने या गोष्टीची केला त्याग, म्हणाला-महाराजांचा आशीर्वाद....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 02:40 PM2023-02-08T14:40:44+5:302023-02-08T14:45:37+5:30

योगयोगेश्वर जय शंकर मालिकेत संग्राम शंकर महाराजांची भूमिका साकारतो आहे. ही भूमिका साकारण्यासाठी तो विशेष मेहनत घेतोयय

Marathi actor Sangram samel stop eating non veg for shankar maharajs role | कौतुकास्पद! शंकर महाराजांच्या भूमिकेसाठी संग्राम समेळने या गोष्टीची केला त्याग, म्हणाला-महाराजांचा आशीर्वाद....

कौतुकास्पद! शंकर महाराजांच्या भूमिकेसाठी संग्राम समेळने या गोष्टीची केला त्याग, म्हणाला-महाराजांचा आशीर्वाद....

googlenewsNext

अनेक कलाकार मग ते बॉलिवूड असो किंवा मराठी कलाविश्वातील आपल्या भूमिकांसाठी प्रचंड मेहनत घेतात. त्या भूमिकेत फिट बसण्यासाठी अभ्यास करतात. सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकार आपल्या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतल्यामुळे चर्चेत आला आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून संग्राम समेळ आहे. संग्राम सध्या कर्लस मराठीवरील योगयोगेश्वर जय शंकर मालिकेत शंकर महाराजांची भूमिका साकारतो आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरली आहे. 

नुकत्याच एका मुलाखतीत संग्राम शंकर महारांजाच्या भूमिकेविषयी म्हणाला, शंकार महाराजांची भूमिका साकारणे ही मोठी जबाबदारी आहे. ही भूमिका अधिक चांगली आणि परिपूर्ण व्हावी यासाठी मी प्रयत्न करतोय. महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे. शंकर महाराज त्यांच्या भक्तांच्या हाकेला कायम धावून जायचं. 

पुढे तो म्हणाला, ही भूमिका साकाराण्यासाठी मी काही वर्कशॉप केले. ज्याची मला भूमिका साकारताना मदत झाली. शंकर महाराजांचे वंशज अजूनही आहेत आणि त्यांचा अभ्यास, कागदपत्रे मला खूप मदत करतात. मी ही भूमिका साकारताना मांसाहार पूर्णपणे बंद केला आहे. शंकर महाराजांचा भक्त परिवार मोठा आहे त्यांच्या कोणत्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी संपूर्ण टीम सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. 

मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमातून अभिनेता संग्राम समेळने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. नाटकापासून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली.स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ललित २०५' या मालिकेत तो दिसला होता. या मालिकेत त्याने नील राजाध्यक्षची भूमिका साकारली होती. संग्रामला खरी ओळख मिळाली ती पुढचं पाऊल या मालिकेतून. या मालिकेतील समीर या व्यक्तीरेखेमुळे तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने 'एकच प्याला' या नाटकात काम केले. या संगीत नाटकातील त्याची सुधाकरची भूमिका प्रेक्षकांना आवडली. 'हे मन बावरे'मध्ये संग्राम दिसला होता. 
 

Web Title: Marathi actor Sangram samel stop eating non veg for shankar maharajs role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.