परदेशात गेलेल्या संकर्षण कऱ्हाडेला अमेरिकेतील एअरपोर्टवर काढावी लागली रात्र, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 18:22 IST2023-09-13T18:22:41+5:302023-09-13T18:22:59+5:30
काही दिवसांपूर्वीच त्याने परदेशात जातानाचा विमानतळावरील फोटो पोस्ट केला होता. परंतु, तिथे गेल्यावर त्याला विमानतळावरच रात्र काढावी लागली.

परदेशात गेलेल्या संकर्षण कऱ्हाडेला अमेरिकेतील एअरपोर्टवर काढावी लागली रात्र, नेमकं काय घडलं?
संकर्षण कऱ्हाडे हा लोकप्रिय मराठी अभिनेता आहे. अनेक मालिका आणि नाटकांमध्ये संकर्षणने काम केलं आहे. संकर्षणचं नियम व अटी लागू हे नाटक सध्या गाजत आहे. या नाटकांच्या प्रयोगांमध्ये तो सध्या व्यग्र आहे. नियम व अटी लागू या नाटकाच्या निमित्तान संकर्षण अमेरिकेला गेला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने परदेशात जातानाचा विमानतळावरील फोटो पोस्ट केला होता. परंतु, तिथे गेल्यावर त्याला विमानतळावरच रात्र काढावी लागली.
संकर्षण सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. संकर्षणने वॉशिंग्टन विमानतळावरील त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने विमानतळावर रात्र घालवण्यामागचं कारण सांगितलं आहे. “आजची रात्रं एअरपोर्टवर...
उद्या सकाळी ६.३०चं विमान आहे ऑकलँडसाठी…तुमचं झालं असं कधी? रात्रं काढावी लागली एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडवर..??” असं कॅप्शन दिलं आहे. ऑकलँडला जाण्यासाठी सकाळी विमान असल्याने संकर्षणला वॉशिंग्टन विमानतळावर रात्र काढावी लागली.
अमेरिकेत उपचारासाठी गेलेले धर्मेंद्र दिसले एकदम फिट, स्वत:च शेअर केला व्हिडिओ, म्हणाले...
शाहरुखचा 'जवान' पाहून किरण माने भारावले, म्हणाले, "लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना गुडघ्यावर आणून..."
दरम्यान, संकर्षणने ‘आभास हा’, ‘खुलता कळी खुलेना’, ‘मला सासू हवी’ या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली होती. त्याने आम्ही सारे खवय्ये, किचन कल्लाकार या शोचे सूत्रसंचालन केलं आहे.