'सकाळी सकाळी पोलिसांनी पकडलं आणि...'; संकर्षणने सांगितलं 'कैद' होण्याचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 12:22 IST2024-06-12T12:21:56+5:302024-06-12T12:22:21+5:30
Sankarshan Karhade: संकर्षणची पोस्ट सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

'सकाळी सकाळी पोलिसांनी पकडलं आणि...'; संकर्षणने सांगितलं 'कैद' होण्याचा किस्सा
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, कवी आणि उत्तम सूत्रसंचालक म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade). आपल्या कलागुणांमुळे संकर्षण अल्पावधीत लोकप्रिय झाला. नाटक, मालिका अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या संकर्षणचा आजा भलामोठा चाहतावर्ग असल्याचा पाहायला मिळतो. त्यामुळे तो कुठेही गेला की चाहते त्याच्याभोवती घेरा घालतात. मात्र, यावेळी तो चक्क पोलिसांच्या कचाट्यात सापडला आहे. याविषयी संकर्षणने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली.
संकर्षण त्याच्या नाटकाच्या निमित्ताने देशविदेशात दौरे करत असतो. त्यामुळे त्याला प्रत्येक ठिकाणी चाहते भेटतात. इतकंच नाही तर तो चाहत्यांच्या विळख्यात अडकलेला असतो. मात्र, यावेळी चक्क पोलिसांच्या विळख्यात तो अडकला. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्याने घडलेला किस्सा सांगितला.
संकर्षणने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत काही पोलीस उभे आहेत. हा फोटो पोस्ट करत त्याने दिलेलं कॅप्शन चर्चेचा विषय ठरत आहे.
काय आहे संकर्षणची पोस्ट?
"सकाळी सकाळी पोलिसांनी पकडलं आणि मला त्यांच्यासोबत फोटो काढायची संधी मिळाली…. आणि अखेर कैद झाला हा सेल्फी ….. जय हिंद", असं कॅप्शन दे त्याने हा फोटो पोस्ट केला आहे.
दरम्यान, संकर्षण माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत अखेरचा झळकला होता. या मालिकेनंतर त्याने त्याचा मोर्चा रंगभूमीकडे वळवला आहे. सध्या त्याची 'तू म्हणशील तसं', 'नियम व अटी लागू' ही दोन्ही नाटकं प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत. विशेष म्हणजे लवकरच तो झी मराठीवर ड्रामा ज्युनिअर या नव्या कार्यक्रमात परिक्षक पदाची भूमिका पार पाडणार आहे.