'इंद्रायणी' मालिकेत संतोष जुवेकरची एन्ट्री; पहिल्यांदाच दिसणार वेगळ्या भूमिकेत, प्रोमो समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 11:31 AM2024-06-07T11:31:35+5:302024-06-07T11:32:04+5:30

'इंद्रायणी' मालिकेत पाठिराखा ही भूमिका अभिनेता संतोष जुवेकर साकारणार आहे. 

marathi actor santosh juvekar entry in indrayani colors marathi serial to play important role | 'इंद्रायणी' मालिकेत संतोष जुवेकरची एन्ट्री; पहिल्यांदाच दिसणार वेगळ्या भूमिकेत, प्रोमो समोर

'इंद्रायणी' मालिकेत संतोष जुवेकरची एन्ट्री; पहिल्यांदाच दिसणार वेगळ्या भूमिकेत, प्रोमो समोर

छोट्या पडद्यावरील 'इंद्रायणी' मालिकेने अल्पवाधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. या मालिकेत इंदूची भूमिका साकारणारी बालकलाकार सांची भोईर घराघरात पोहोचली आहे. लडिवाळ अभिनयाने ती प्रेक्षकांची मनं जिंकून घेते. या मालिकेत अनिता दाते, संदीप पाठक असे दमदार कलाकार आहेत. आता मालिकेत लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकरची एन्ट्री झाली आहे. 

'इंद्रायणी' ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. एकीकडे इंदू दिग्रसकर वाड्यात राहायला गेली असून तिथे ती प्रत्येक कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. तर दुसरीकडे इंदूच्या सतत पाठीशी असलेले तिचे लाडके व्यंकू महाराज यांची तब्येत बिघडत चालली असून इंदूला त्यांची काळजी लागली आहे. एका साधूबाबांनी सांगितल्याप्रमाणे इंदूला व्यंकू महाराजांना वाचविण्याकरता मोठी कसोटी पार पाडावी लागणार आहे. या प्रवासात पाठिराखा इंदूची साथ देताना आणि तिला मदत करताना दिसणार आहे. 'इंद्रायणी' मालिकेतील पाठिराखा ही भूमिका अभिनेता संतोष जुवेकर साकारणार आहे. 

या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये साधू बाबांनी इंदूला जी संजीवनी सांगितली होती इंदू आता त्याच संजीवनीच्या शोधात आळंदीला जात असल्याचं दिसत आहे. पण, पैसे अपुरे असताना  आणि कसली माहिती नसताना तिचा हा आळंदीचा प्रवास कसा होईल? तिच्या या खडतर प्रवासात पाठीराखा तिची साथ देणार आहे. आता हे दोघे मिळून हा प्रवास कसा पार पाडणार, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. 

इंदूची जबरदस्त इच्छाशक्ती आणि तिचा हा आळंदीचा खडतर प्रवास इंदूला व्यंकू महाराजांसाठी संजीवनी मिळवून देईल का? तिचं आराध्य दैवत असलेले श्री विठूमाऊली तिला कशी कशी साथ करतील? हे मालिकेच्या पुढील भागात पाहायला मिळणार आहे. १० जूनपासून इंदूचा नवीन प्रवास सुरू होणार असल्याने मालिका आणखी रंजनकारक होणार आहे. 

Web Title: marathi actor santosh juvekar entry in indrayani colors marathi serial to play important role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.