Video: मराठमोळ्या अभिनेत्याची प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला हजेरी, गंगास्नान करुन सांगितला विलक्षण अनुभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 09:38 IST2025-01-14T09:37:06+5:302025-01-14T09:38:07+5:30
मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने प्रयागराजयेथील महाकुंभमेळ्याला हजेरी लावली आहे (mahakumbhmela)

Video: मराठमोळ्या अभिनेत्याची प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला हजेरी, गंगास्नान करुन सांगितला विलक्षण अनुभ
दर १२ वर्षांनी आयोजित केलेल्या महाकुंभमेळ्याला कालपासून सुरुवात झालीय. देशभरातील साधू आणि सामान्य जनता प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्याला हजेरी लावत आहेत. शंखध्वनी आणि भजनांच्या गजरात या प्रसिद्ध मेळ्याचा काल औपचारिक प्रारंभ झाला. याच महाकुंभमेळ्यात जाण्याचं भाग्य मराठमोळा अभिनेता सौरभ चौगुलेला मिळालंय. सौरभने महाकुंभमेळ्याला गेल्यावर त्याला आलेला खास अनुभव शेअर केलाय. याशिवाय गंगास्नानाचा व्हिडीओही शेअर केलाय.
सौरभचा महाकुंभमेळ्याचा खास अनुभव
सौरभने सोशल मीडियावर महाकुंभमेळ्याचा व्हिडीओ शेअर करुन लिहिलंय की, "अचानक जुना मित्र कुंभला जातोय असं सांगतो काय!! त्याच्या ग्रुप मधला एक मेंबर कॅन्सल होतो काय!! आणि शेवटच्या क्षणाला माझं कुंभ मिळाला जायचं ठरतं काय!! निव्वळ योगायोग असे म्हणतात जोवर तो बोलवत नाही तोवर आपलं त्याला भेटणं होत नाही."
"असंच काहीसं हे एक, १४४ वर्षानंतर येणाऱ्या महा कुंभमेळा, असं म्हणतात तीन पिढ्या नंतर एका पिढीला हा योग मिळतो. आणि मला तो मिळाला. देवाचे खूप खूप आभार. धर्म, ज्ञान आणि नवनवीन व्यक्तींची भेट खरंच खूप काही शिकवून जातं. || हर हर गंगे, हर हर महादेव ||" अशाप्रकारे सौरभने त्याला आलेला खास अनुभव सांगितलाय. सौरभला आपण 'जीव माझा गुंतला' मालिकेत अभिनय करताना पाहिलंय. सौरभने याच मालिकेतील अभिनेत्री योगिता चव्हाणसोबत खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधली.