खरं खरं सांगतो म्हणत शशांक केतकरनं सांगितलं लग्नाचं गुपित, प्रियंकानं या अटीवर दिला होता लग्नाला होकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 12:29 PM2022-03-14T12:29:29+5:302022-03-14T12:31:25+5:30
Shashank Ketkar Video : सुलेखा तळवलकर यांनी दिलेलं ‘खरं खरं सांग’ हे चॅलेंज स्वीकारत शशांकने ‘खरं खरं सांगतो,’असं म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे
सोशल मीडियावर वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळतात. वेगवेगळी चॅलेंज बघायला मिळतात. सध्या सध्या मराठी मनोरंजन विश्वात ‘खरं खरं सांग..’ या नव्या चॅलेंजची चर्चा आहे. मराठी सेलिब्रिटी आपल्या सहकलाकारांना ‘खरं खरं सांग..’ चॅलेंज देताना दिसत आहेत. अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी अभिनेता शशांक केतकरला (Shashank Ketkar) हे चॅलेंज दिलं. मग काय, शशांकने त्याच्या लग्नाबद्दलचं एक मोठ्ठ गुपित सगळ्यांसोबत शेअर केलं. होय, पत्नी प्रियंकाने त्याला कोणत्या अटीवर लग्नाला होकार दिला? हे त्यानं खरं खरं सांगितलं.
सुलेखा तळवलकर यांनी दिलेलं ‘खरं खरं सांग’ हे चॅलेंज स्वीकारत शशांकने ‘खरं खरं सांगतो,’असं म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे. खरं खरं सांगतो असं म्हणतच शशांकने या व्हिडिओची सुरूवात केली आहे.
यात तो म्हणतो,‘सुलेखा ताईनं मला खरं खरं सांग हे चॅलेंज मला दिलं आहे. दुपारी लंचब्रेकमध्ये आम्ही जेवणाचे डबे उघडतो. माझ्या डब्यातील भाज्या आणि सगळं काही खरंच मी केलेलं असतं. कारण मला स्वयंपाक करायला खूप आवडतं. जेवण बनवण्याचा मला कधीच कंटाळा येत नाही. प्रियंकाला मी प्रपोज केलं तेव्हा तिने अगदी याच अटीवर मला होकार दिला होता. मी दमलेले असेल तेव्हा तू स्वैपाक करशील ना? असं तिने मला विचारलं होतं. मी हो म्हटल्यावरच तिने लग्नाला होकार दिला होता. शूटिंग नसतं किंवा एक मालिका संपून दुसरं काम हातात नसतो तेव्हाही मी वेगवेगळे पदार्थ बनवण्याचाच उद्योग करत असतो. माझ्या बायकोला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो किंवा ती दमून येते तेव्हा स्वयंपाकघराचा ताबा मीच घेतो...
तुम्हाला माहित असेलच की, शशांकचं स्वत:चं एक युट्यूब चॅनल आहे. यात तो वेगवेगळं खाद्य पदार्थ बनवताना दिसतो. ‘आईच्या गावात’ हे हॉटेलही त्याने सुरू केलं आहे. सध्या शशांक मुरांबा या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.