"बाकी सगळं जग एका बाजूला अन् तुझ्यावरचं प्रेम.."; शशांक केतकरची लग्नाच्या वाढदिवशी पत्नीसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 10:57 AM2024-12-04T10:57:57+5:302024-12-04T10:58:17+5:30

शशांक केतकरने लग्नाच्या वाढदिवशी बायकोसाठी खास पोस्ट लिहिली असून ती चर्चेत आहे (shashank ketkar)

marathi actor Shashank Ketkar special post for wife priyanka ketkar on wedding anniversary | "बाकी सगळं जग एका बाजूला अन् तुझ्यावरचं प्रेम.."; शशांक केतकरची लग्नाच्या वाढदिवशी पत्नीसाठी खास पोस्ट

"बाकी सगळं जग एका बाजूला अन् तुझ्यावरचं प्रेम.."; शशांक केतकरची लग्नाच्या वाढदिवशी पत्नीसाठी खास पोस्ट

चित्रपट, नाटक, मालिका, वेबसीरिज अशा चारही माध्यमांमध्ये अभिनेता शशांक केतकरने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या अभिनेता स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शशांकने वैयक्तिक आयुष्यात ४ डिसेंबर २०१७ मध्ये त्याची मैत्रीण प्रियांका ढवळेबरोबर लग्न केलं. आज त्यांच्या लग्नाला ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने शशांकने खास पोस्ट शेअर करत बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शशांकची प्रियंकासाठी खास पोस्ट

शशांकने प्रियंकासोबतचे फोटो पोस्ट करुन मोजक्या शब्दात बायकोसाठी लिहिलंय की, "फक्त ७ वर्ष झाली .. बाकी सगळं जग एका बाजूला आणि तुझ्या वरचं प्रेम… तू एका बाजूला.." शशांकने लग्नापासून आजपर्यंतचे प्रियंकासोबतचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर केलेत. यात दोघांचे अनेक क्यूट मूमेंट्स पाहायला मिळतात. शशांकने प्रियंकासाठी पोस्ट करताच मराठी कलाकारांनी आणि चाहत्यांनी दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.


शशांक केतकरचं वर्कफ्रंट

शशांक आणि प्रियंका या दोघांना २१ डिसेंबर २०२० ला मुलगा झाला. या दोघांनी मुलाचं नाव ऋग्वेद असं ठेवलंय. शशांक केतकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तो सध्या हिंदी-मराठी मनोरंजन विश्वातील कलाकृतींमध्ये अभिनय करतोय. तो सध्या स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' मालिकेत अभिनय करतोय. याशिवाय त्याने 'स्कॅम २००३ द तेलगी स्टोरी' या हिंदी वेबसीरिजमध्ये अभिनय केलाय. शशांक सध्या मराठी मालिका आणि हिंदी ओटीटीविश्व गाजवतोय.

Web Title: marathi actor Shashank Ketkar special post for wife priyanka ketkar on wedding anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.