मराठी अभिनेत्याला लॉटरी लागली! उर्वशी रौतेलाबरोबरचा फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 02:20 PM2024-01-21T14:20:04+5:302024-01-21T14:20:32+5:30

अजय देवगणनंतर आता उर्वशी रौतेलासोबत स्क्रीन शेअर करणार मराठमोळा अभिनेता? फोटो व्हायरल

marathi actor siddharth bodke with bollywood actress urvashi rautela photo goes viral | मराठी अभिनेत्याला लॉटरी लागली! उर्वशी रौतेलाबरोबरचा फोटो होतोय व्हायरल

मराठी अभिनेत्याला लॉटरी लागली! उर्वशी रौतेलाबरोबरचा फोटो होतोय व्हायरल

मराठी कलाविश्वातील चमचमते सितारे बॉलिवूडमध्येही त्यांच्या अभिनयाची छाप सोडताना दिसतात. सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, वैद्येही परशुरामे यांच्यानंतर आता सिद्धार्थ बोडके या मराठमोळ्या अभिनेत्याची चर्चा आहे. टीव्ही मालिकांमध्ये काम करून घराघरात पोहोचलेला सिद्धार्थ 'दृश्यम २' या बॉलिवूड सिनेमात झळकला होता. आता त्याच्या बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाबरोबरचा फोटो व्हायरल झाला आहे. 

छोट्या पडद्यावरील 'तू अशी जवळी राहा' मालिकेने सिद्धार्थला प्रसिद्धीझोतात आणलं. त्यानंतर तो अनेक मालिकांमध्ये दिसला. मराठीबरोबरच हिंदी मालिकेतही सिद्धार्थ महत्त्वपूर्ण भूमिकेत होता. अनेक मराठी सिनेमांमध्येही त्याने काम केलं. पण २०२२मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दृश्यम २'मध्ये सिद्धार्थला पाहून चाहते अवाक् झाले होते. या सिनेमातही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. अजय देवगणबरोबर स्क्रीन शेअर केल्यानंतर आता सिद्धार्थने पुन्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली की काय, अशी चर्चा रंगली आहे. 

सिद्धार्थ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेकदा तो पोस्टद्वारे किंवा फोटो शेअर करत माहिती देत असतो. नुकतंच सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन उर्वशी रौतेलाबरोबरचा फोटो शेअर केला आहे. त्याचा हा फोटो पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. सिद्धार्थ उर्वशीबरोबर सिनेमात दिसणार का? पुन्हा त्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याबाबत मात्र सिद्धार्थने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. 

'तू अशी जवळी राहा' नंतर सिद्धार्थने 'नेबर्स', 'भय', 'टाइम बरा वाईट' या सिनेमात काम केलं. 'गुम है किसी के प्यार में' या गाजलेल्या हिंदी मालिकेत तो झळकला होता. आता तो 'श्रीदेवी प्रसन्न' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: marathi actor siddharth bodke with bollywood actress urvashi rautela photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.