"तिने माझे हात हातात धरले अन् रडायला लागली...", सुयश टिळकने सांगितला हृदयद्रावक प्रसंग; म्हणाला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 17:35 IST2025-03-23T17:29:46+5:302025-03-23T17:35:18+5:30

सुयश टिळक हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे.

marathi actor suyash tilak shared fan moment of jyachi tyachi lovestory set video viral  | "तिने माझे हात हातात धरले अन् रडायला लागली...", सुयश टिळकने सांगितला हृदयद्रावक प्रसंग; म्हणाला... 

"तिने माझे हात हातात धरले अन् रडायला लागली...", सुयश टिळकने सांगितला हृदयद्रावक प्रसंग; म्हणाला... 

Suyash Tilak: 'का रे दुरावा', 'दुर्वा', 'पुढचं पाऊल' या मालिकांतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे सुयश टिळक (Suyash Tilak). उत्तम अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर त्याने इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. सुयशने मालिकांबरोबरच सिनेमातही काम केलं आहे. विविधांगी भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. सध्या तो 'ज्याची त्याची लव्ह स्टोरी' या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अशातच नुकताच अभिनेत्याचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. 'झी नाट्य गौरव २०२५' पुरस्कार दरम्यान अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील हृदयस्पर्शी किस्सा शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे अभिनेता प्रचंड चर्चेत आला आहे. 


नुकताच सोशल मीडियावर झी मराठी वाहिनीकडून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता सुयश टिळकने त्याच्या नकळत हृदय स्पर्शून जाणारा किस्सा सांगितला आहे. त्यावेळी अभिनेता म्हणाला, "आता जे माझं नाटक चालू आहे 'ज्याची त्याची लव्हस्टोरी' त्या नाटकानंतर  अलीकडेच घडलेला एक किस्सा आहे. या नाटकामध्ये मी विवेक नावाची भूमिका करतोय. तर त्याच्या आयुष्यातली मोठी इनसिक्योरिटी म्हणजे त्याला आयुष्यात सगळ्यात जास्त कशाची भीती वाटते, याबद्दल तो सगळ्यांसमोर व्यक्त होतो. परवा पुण्यात या नाटकाचा प्रयोग झाला. त्यावेळी एक मुलगी आली आणि तिने माझे हात हातात धरले आणि ती रडायला लागली."

नेमकं काय घडलं?

नाटकाच्या प्रयोगादरम्यान घडलेला किस्सा सांगताना सुयश म्हणाला, "त्यावेळेस मला कळतं नव्हतं काय करायचं. कारण बऱ्याचदा आपण परफॉर्म करताना आपल्याला लक्षातही येत नाही, नकळत आपण किती जणांच्या आयुष्याला अलगद स्पर्श करुन जातो. तेव्हा तिने माझे हात हातात धरले आणि मला म्हणाली की, माझ्या आयुष्यातली सगळ्या मोठी इनसिक्योरिटी तुझ्यामुळे मला बघायला मिळाली. शिवाय मला नवीन एक प्रेरणा मिळाली आहे. आपण एकटे असलो किंवा आपल्या आयुष्यात आपल्याबरोबर कोणीच नाहीये असं वाटतं असलं तरीसुद्धा आपल्याला छान आयुष्य जगता येतं. हे तिला त्या नाटकातून मिळालं. तर तो माझ्यासाठी हा फारच हलवून टाकणारा किस्सा होता." असा हृदयस्पर्शी किस्सा अभिनेत्याने सांगितला. 

Web Title: marathi actor suyash tilak shared fan moment of jyachi tyachi lovestory set video viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.