लोकप्रिय अभिनेते विजय पटवर्धन यांची पत्नीही अभिनेत्री, 'अवंतिका' मालिकेत केलंय काम! तुम्ही ओळखलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 11:30 AM2024-10-03T11:30:37+5:302024-10-03T11:32:31+5:30

विजय पटवर्धन यांनी पत्नीने अभिनय क्षेत्र का सोडलं याचा खुलासा पोस्टमधून केलाय (vijay patwardhan)

marathi actor Vijay Patwardhan wife is also an actress work in avantika marathi serial | लोकप्रिय अभिनेते विजय पटवर्धन यांची पत्नीही अभिनेत्री, 'अवंतिका' मालिकेत केलंय काम! तुम्ही ओळखलं?

लोकप्रिय अभिनेते विजय पटवर्धन यांची पत्नीही अभिनेत्री, 'अवंतिका' मालिकेत केलंय काम! तुम्ही ओळखलं?

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते म्हणजे विजय पटवर्धन. विजय यांना आपण विविध मालिका, सिनेमे, नाटकांमधून अभिनय करताना पाहिलंय. विजय पटवर्धन यांनी 'फू बाई फू' सारखे कॉमेडी शो सुद्धा गाजवले आहेत. सध्या विजय अनेक सोशल मीडिया स्टारसोबत रील करुन व्हिडीओ करत असतात. विजय यांनी सोशल मीडियावर पत्नीविषयी पोस्ट करुन एक खुलासा केलाय. नाटक, मालिकाविश्वात काम केलेल्या पत्नीने अभिनय क्षेत्र का सोडलं? याबद्दल विजय पटवर्धन यांनी खुलासा केलाय. 

विजय पटवर्धन यांचा पत्नीविषयी खुलासा

विजय पटवर्धन यांनी पत्नीचा फोटो पोस्ट करुन खुलासा केलाय की, "बीएमसीसी मध्ये असताना पुरुषोत्तम आणि फिरोदिया करंडक एकांकिका स्पर्धांमध्ये उत्तम अभिनय तिने केला. पुढे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने माझ्याशी लग्न केलं. "वृषाली देगांवकर"ची ती, "वृषाली पटवर्धन" झाली आणि दोन नाटकवेड्या लोकांचा संसार चालू झाला. स्वभावाला औषध नाही, सासूबाईंचं असंच असतं, कुर्यात सदा टिंगलम, अरे हाय काय नि नाय काय, लग्नाची बेडी, मंगळसूत्र, सबसे बडा रूपैय्या, आनंदी आनंद आणि ऑल द बेस्ट अशा अनेक नाटकांमध्ये तिने अप्रतिम काम केलं. तर, कथाकथी, झालं मोकळं आकाश, अवंतिका ह्या मालिकांमध्ये आणि उलाढाल, लागली पैज, संशयकल्लोळ अशा चित्रपटांमध्येही तिने अप्रतिम भूमिका केल्या."


विजय पटवर्धन पुढे लिहितात, "माझ्या इतकंच तिलाही नाटकाचं वेड होतं. पण, आमच्या संसारात पौरवीचं आगमन झालं आणि दोघांपैकी एकाचं फिक्स इनकम असावं म्हणून तिने नाटक सोडून नोकरी करायचं ठरवलं. खरं तर तिची नाटकात काम करायची खूप इच्छा असूनही संसारासाठी तिने तीची इच्छा बाजूला ठेवली. आत्ता मी जो काही आहे ते फक्त आणि फक्त हिच्यामुळेच. माझ्या आयुष्यातली सगळ्यात जास्त महत्वाची व्यक्ती म्हणजेच, "वृषाली". संसार आणि नोकरी व्यवस्थीत सांभाळून आणि आता हीलिंग आणि सामाजिक कार्यात सदैव खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या वृषालीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अशीच सदैव माझ्या आणि पौरवीच्या सोबत रहा."

Web Title: marathi actor Vijay Patwardhan wife is also an actress work in avantika marathi serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.