अखेर ठरलं! ‘या’ तारखेला होणार विराजस कुलकर्णी व शिवानी रांगोळेचं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 11:05 IST2022-04-14T11:05:03+5:302022-04-14T11:05:58+5:30
विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि शिवानी रांगोळे (Shivani Rangole) हे मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडपं. गेल्या काही दिवसांपासून या जोडप्याच्या लग्नाबद्दलची चर्चा ऐकायला मिळतेय.

अखेर ठरलं! ‘या’ तारखेला होणार विराजस कुलकर्णी व शिवानी रांगोळेचं लग्न
विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि शिवानी रांगोळे (Shivani Rangole) हे मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडपं. गेल्या काही दिवसांपासून या जोडप्याच्या लग्नाबद्दलची चर्चा ऐकायला मिळतेय. काही महिन्यांआधी त्यांची रिंग सेरेमनी पार पडली होती. साहजिकच हे जोडपं कधी लग्न करणार, हे जाणून घेण्याची चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. तर आता या प्रश्नाचं उत्तरही मिळालं आहे. विराजस व शिवानी येत्या मे महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत.
विराजस हा प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे.‘माझा होशील ना’ मालिकेतून विराजस घराघरात पोहोचला. तर शिवानी नुकतीच ‘सांग तू आहेस ना’ मालिकेत सिद्धार्थ चांदेकर सोबत दिसली होती.
सोशल मीडियावर शिवानी आणि विराजस यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, शिवानी आणि विराजसने कधीही काही लपवून ठेवलं नाही. आता अखेर ते दोघे लग्नबंधणार अडकणार आहेत. यासाठी येत्या 7 मे रोजीचा मुहूर्त निवडण्यात आला आहे.
येत्या ७ मे रोजी विराजस आणि शिवानी यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. पुण्यात हा विवाहसोहळा पार पडणार असून त्यांच्या लग्नाला काही खास व्यक्ती आणि मित्रमंडळींना आमंत्रित करण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी विराजस आणि शिवानी यांनी एका जाहिरातीसाठी लग्नाचं चित्रीकरण केलं होतं. त्यावेळेस सोशल मीडियावर शिवानी आणि विराजस यांनी गुपचूप लग्न केल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यांनी एका ज्वेलरी ब्रॅण्डसाठी ते चित्रीकरण केलं होतं हे नंतर उघड झालं होतं. आता अखेर ते दोघे खरंच विवाहबंधनात अडकायला तयार आहे. . तर शिवानीने ब?्याच मराठी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.