विशाल निकमला येड लागलं प्रेमाचं! 'या' अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपच्या चर्चा, कॅप्शनमुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 04:29 PM2024-08-31T16:29:48+5:302024-08-31T16:30:26+5:30

विशाल निकम प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. एका पोस्टमुळे आणि त्या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमुळे या चर्चांना उधाण आलं आहे.

marathi actor vishal nikam and akshaya hindalkar dating each other post goes viral | विशाल निकमला येड लागलं प्रेमाचं! 'या' अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपच्या चर्चा, कॅप्शनमुळे चर्चेला उधाण

विशाल निकमला येड लागलं प्रेमाचं! 'या' अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपच्या चर्चा, कॅप्शनमुळे चर्चेला उधाण

मराठी अभिनेताविशाल निकम त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनं जिंकतो. 'दख्खनचा राजा ज्योतिबा माझा' या मालिकेतून त्याला प्रसिद्धी मिळाली. सध्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या विशालला खरंच प्रेमाचे वेध लागले आहेत. विशाल निकम प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. एका पोस्टमुळे आणि त्या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमुळे या चर्चांना उधाण आलं आहे.

विशाल निकम बिग बॉस मराठी तिसऱ्या पर्वात सहभागी झाला होता. या पर्वाचा तो विजेताही होता. पण, बिग बॉसच्या घरातील त्याच्या खेळापेक्षा जास्त विशालच्या सौंदर्याची चर्चा रंगली होती. विशालने त्याच्या आयुष्यातील सौंदर्याबद्दल बिग बॉस मराठीच्या घरात खुलासा केला होता. परंतु, ती सौंदर्या नेमकी कोण? याबाबत मात्र त्याने काहीच सांगितलं नव्हतं. आता मात्र विशालच्या या सौंदर्याची पोलखोल झाली आहे. आणि त्याला विशाल आणि त्याच्या सौंदर्याने केलेली एक पोस्ट कारण ठरली आहे. 

विशालने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्याचे काही फोटो पोस्ट केलेत. या फोटोला त्याने "विशेषता जानकर चाहना "आकर्षण" है, कमियां जानकर चाहना "प्रेम" है…", असं कॅप्शन दिलं आहे. तर दुसरीकडे विशालच्या सौंदर्यानेही फोटो पोस्ट करत तिच्या फोटोंनाही हेच कॅप्शन दिलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अक्षया हिंदळकर आहे. 

अक्षयाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन साडीतील काही फोटो शेअर करत "विशेषता जानकर चाहना "आकर्षण" है, कमियां जानकर चाहना "प्रेम" है…", असं कॅप्शन दिलं आहे. दोघांनीही प्रेमासंबंधातील हे कॅप्शन फोटोला दिल्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या आहेत. सध्या अक्षया 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

Web Title: marathi actor vishal nikam and akshaya hindalkar dating each other post goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.