Video: राणादा अन् अंजलीचा रॉयल लूक; हार्दिक-अक्षयावर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 18:16 IST2022-06-28T18:14:55+5:302022-06-28T18:16:10+5:30
Hardeek joshi: सध्या सोशल मीडियावर अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघंही रॉयल अंदाजात दिसत आहेत.

Video: राणादा अन् अंजलीचा रॉयल लूक; हार्दिक-अक्षयावर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा
'तुझ्यात जीव रंगला' असं म्हणत एकमेकांच्या प्रेमात पडलेली लोकप्रिय जोडी म्हणजे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून ही जोडी पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आली. या मालिकेतील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. त्यामुळे खऱ्या आयुष्यातही या दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. विशेष म्हणजे या दोघांनी साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. तेव्हापासून ही जोडी सातत्याने चर्चेत येत आहे.
सध्या सोशल मीडियावर अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघंही रॉयल अंदाजात दिसत असून एका रोमॅण्टिक गाण्यावर त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान,अक्षया आणि हार्दिकने एखाद्या ब्रँडसाठी हे फोटोशूट केल्याचं दिसून येत आहे.यात अक्षया व हार्दिकने मरुन रंगाचा ट्रेडिशनल आऊटफिट परिधान केला आहे. हा व्हिडीओ हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.