"मित्र-मैत्रिणी जोडता येतात पण...", प्रसिद्ध अभिनेत्री वडिलांच्या आठवणीत झाली भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 12:08 IST2025-02-20T12:03:05+5:302025-02-20T12:08:09+5:30
अभिनेत्री सीमा घोगले सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

"मित्र-मैत्रिणी जोडता येतात पण...", प्रसिद्ध अभिनेत्री वडिलांच्या आठवणीत झाली भावुक
Seema Ghogale: छोट्या पडघ्यावरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe kay karte) या मालिकेने आपला भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. अरुंधती, अनिरुद्ध, संजना तसेच कांजन आजी, अप्पा, यश आणि ईशा ही पात्रे प्रचंड गाजली. याच मालिकेमुळे अभिनेत्री सीमा घोगले प्रसिद्धीझोतात आली. सीमाने मालिकेमध्ये विमल नावाचं पात्र साकारलं होतं. सध्या ही अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच तिने वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री सीमा घोगलेने नुकताच सोशल मीडियावर तिच्या वडिलांचा एक फोटो पोस्ट केला आहे. ही पोस्ट शेअर करुन अभिनेत्री भावुक झाली आहे शिवाय तिने या पोस्टद्वारे वडिलांच्या आठवणी सांगितल्या आहेत. अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलंय, "वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा...! मी तुम्हाला भरवलेला पहिला आणि शेवटचा घास..., आपण गप्पा मारल्याच, मिठी मारल्याच किंवा अगदी हसत एकमेकांना टाळी दिल्याचं सुद्धा आठवत नाही मला…, आपल्या वयातल अंतर असेल म्हणा किंवा त्या काळातली विचारधारा असेल तुम्ही मित्र नाही झालात बाबाच राहिलात."
पुढे तिने लिहिलंय, "आज कळतंय मित्रमैत्रिणी जोडता येतात, बाबा नाही. तुम्ही होतात तेव्हा वाटायचं हे फार बोलत का नाहीत, आता जेव्हा तुम्ही नाही आहात तेव्हा कळतंय तुमचं असणं हीच सगळ्यात मोठी ताकद होती बाबा तुम्ही, आई आणि आपलं घर याची खूप आठवण येते." अशी भावुक पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे.
वर्कफ्रंट
अभिनेत्री सीमा घोगलेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. अलिकडेच ती 'पिरतीचा वनवा उरी पेटला' या मालिकेत झळकली होती.