"सिनेइंडस्ट्रीतही मॅटर्निटी लीव्ह हवी", अदिती सारंगधरचं स्पष्ट वक्तव्य; म्हणते- यामुळे आम्हाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 05:28 PM2024-03-09T17:28:35+5:302024-03-09T17:28:48+5:30
"गरोदरपणानंतर मिळणारी सुट्टी...", मॅटर्निटी लीव्हबाबत स्पष्टच बोलली अदिती सांरगधर
अनेक मालिका, नाटक आणि सिनेमा यांमध्ये विविधांगी भूमिका साकारून अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे अदिती सारंगधर. 'वादळवाट', 'नवे लक्ष्य', 'ह.म. बने तु.म. बने' यांसारख्या मालिकांमध्ये ती महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसली. तर 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेमुळे अदिती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेतील खलनायिकेच्या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली.
सध्या अदिती तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. सिनेइंडस्ट्रीतही मॅटर्निटी लीव्ह हवी, असं महाराष्ट्र टाइम्सला महिला दिनानिमित्त दिलेल्या मुलाखतीत अदिती म्हणाली. "गरोदरपणानंतर जी लीव्ह मिळते...मॅटर्निटी लीव्ह तशी इंडस्ट्रीत पद्धत नाही. बाकी सगळ्या क्षेत्रात त्या मॅटर्निटी लीव्हचं महत्त्व खूप मोठं आहे. आपल्या क्षेत्रात मॅटर्निटी लीव्हच नाही. त्यामुळे कलाकाराला इन्सिक्युरिटी आहे. मला वाटतं खूप महिन्याची नाही पण ३ महिन्यांची तरी मॅटर्निटी लीव्ह हवी," असं अदिती म्हणाली.
सध्या अदिती मास्टर माइंड या नाटकामुळे चर्चेत आहे. या नाटकात अदितीबरोबरच अभिनेता आस्ताद काळेदेखील मुख्य भूमिका साकारत आहे. अदितीने 'नवरा माझा भवरा', 'उलाढाल', 'नाथा पुरे आता', 'ती रात्र', 'मंडळी तुमच्यासाठी कायपण' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.