VIDEO: ४३ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स! सोबतीला आहे 'ही' लोकप्रिय अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 16:40 IST2025-02-07T16:38:03+5:302025-02-07T16:40:57+5:30
सोशल मीडियावरील कलाकारांचे रील्स किंवा व्हिडीओ अनेकदा चर्चेचा विषय ठरतात.

VIDEO: ४३ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स! सोबतीला आहे 'ही' लोकप्रिय अभिनेत्री
Aishwarya Narkar Video: सोशल मीडियावरील कलाकारांचे रील्स किंवा व्हिडीओ अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. बऱ्याचदा त्यांचं कौतुक सुद्धा केलं. अशातच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि अविनाश नारकर (Avinash Narkar) यांच्या डान्सचे व्हिडीओ नेहमीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. नारकर जोडपं अभिनयासह सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. दरम्यान, ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नुकताच त्यांनी इन्स्टाग्रामवर खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये १९८२ मधील 'नदियों के पार' सिनेमातील 'कौन दिसा में लेके चला रे बटोहिया' या गाण्यावर अप्रतिम नृत्य केलं आहे.
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांच्या डान्स व्हिडीओचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माम झाला आहे. पण, अनेकदा त्या डान्स व्हिडीओमुळे ट्रोलही होतात. नुकताच ऐश्वर्या नारकर यांनी सुंदर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याच्यांसोबत लोकप्रिय मराठी अभिनेत्री अश्विनी कासार देखील पाहायला मिळतेय. या व्हिडीओमधील त्यांच्या हावभावाने वेधलं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॅकग्राउंडला नदीचं वाहणारं झुळझुळ पाणी आणि निसर्गाच्या सानिध्यात जाऊन त्यांनी हा सुंदर व्हिडीओ शूट केला आहे. "Vibing together with nature...", असं कॅप्शन त्यांनी य व्हिडीओला दिलं आहे.
वर्कफ्रंट
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर अलिकडेच झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत दिसल्या. या मालिकेत त्यांनी साकारलेल्या खलनायिकेच्या पात्राला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तर अविनाश नारकर स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत काम करताना दिसत आहेत.