'तू खरंच कार्टून आहेस'; ट्रोल करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरचं सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 14:00 IST2023-08-18T14:00:00+5:302023-08-18T14:00:00+5:30
Aishwarya narkar: ऐश्वर्या यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला तिने प्ले केलेल्या गाण्यामुळे एका नेटकऱ्याने त्यांना ट्रोल केलं.

'तू खरंच कार्टून आहेस'; ट्रोल करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरचं सडेतोड उत्तर
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. दमदार अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर ऐश्वर्या यांनी कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. कलाविश्वात सक्रीय असलेल्या ऐश्वर्या सोशल मीडियावरही कमालीच्या अॅक्टीव्ह आहेत. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असतात. यामध्येच एका ट्रोलरला त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
अलिकडेच ऐश्वर्या यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी प्राऊंड महाराष्ट्रीयन असं कॅप्शन दिलं होतं. तसंच बॅकग्राऊंडला बॉलिवूड सॉन्ग प्ले केलं होतं. विशेष म्हणजे त्यांचं हे बॉलिवूड सॉन्ग ऐकल्यानंतर एका युजरने त्यांना ट्रोल केलं आहे.
'महाराष्ट्रीयन आहोत तर हे सांगायला हिंदी गाणं कशाला?' असा प्रश्न एका युजरने विचारला. त्यावर, 'खरंच कार्टून आहेस तू', असं प्रत्युत्तर ऐश्वर्या नारकर यांनी दिलं. कार्टून की दुनिया या अकाऊंटवरुन ही कमेंट करण्यात आली होती. दरम्यान, अलिकडेच ऐश्वर्या यांनी इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्यांनी त्यांना प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल आयुष्याविषयी देखील प्रश्न विचारले होते.