'एक बार देख लिजिए...'; 'हिरामंडी'ची ऐश्वर्या नारकरला भुरळ, video होतोय तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 16:04 IST2024-05-18T15:51:08+5:302024-05-18T16:04:20+5:30
Aishwarya narkar: ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर सक्रीय असून कायम नवनवीन ट्रेंड फॉलो करत असतात.

'एक बार देख लिजिए...'; 'हिरामंडी'ची ऐश्वर्या नारकरला भुरळ, video होतोय तुफान व्हायरल
संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansale) यांची 'हिरामंडी' (heeramandi) ही वेबसीरिज सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मल्टीस्टारर असलेली ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून त्यातील प्रत्येक गाणं, संवाद नेटकऱ्यांमध्ये व्हायरल होत आहेत. या सीरिजमधील आलमजेबवर चित्रीत झालेलं एक बार देख लिजिए हे गाणं तर वाऱ्यासारखं व्हायरल होत असून त्यावर अनेकांना व्हिडीओ शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या गाण्यावर रील करायचा मोह ऐश्वर्या नारकर यांनाही आवरला नाही.
ऐश्वर्या नारकर यांचा सोशल मीडियावर दांडगा वावर आहे. त्यामुळे त्या कायम चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतात. यात बऱ्याचदा त्या त्यांच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याचे अपडेटही देतात. यात खासकरुन त्या सोशल मीडियावर व्हायरल होणारे ट्रेंडही फॉलो करत असतात.
सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात त्यांनी हिरामंडी या वेबसीरिजमधील एक बार देख लिजिए या गाजलेल्या गाण्यावर रील शेअर केलं आहे. मराठमोळ्या साजशृंगारात त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून सध्या तो चर्चेत येत आहे.