सलोना सा सजन हैं..; ऐश्वर्या नारकरांनी शेअर केला अविनाश यांच्या सोबतचा खास व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 13:46 IST2024-04-15T13:46:13+5:302024-04-15T13:46:57+5:30
Aishwarya narkar: या व्हिडीओमधून ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या प्रेमासोबतच त्यांच्यातील मैत्रीही दिसून येत आहे.

सलोना सा सजन हैं..; ऐश्वर्या नारकरांनी शेअर केला अविनाश यांच्या सोबतचा खास व्हिडीओ
मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन कपल म्हणून कायम चर्चेत येणारी जोडी म्हणजे अविनाश नारकर (avinash narkar) आणि ऐश्वर्या नारकर (aishwarya narkar). उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर या जोडीने मराठी इंडस्ट्रीत त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. ही जोडी सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे.
ऐश्वर्या वरचेवर इन्स्टाग्रामवर अविनाश नारकरांसोबतचे काही फोटो वा व्हिडीओ शेअर करत असतात. यात अनेकदा ते ट्रेंडिंग रील्स फॉलो करताना दिसून येतात. त्यामुळे त्यांच्या व्हिडीओवर नेटकरी संमिश्र प्रतिक्रियाही देतात. परंतु, यावेळी त्यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून नेटकरी या जोडीच्या प्रेमात पडले आहेत.
'सलोना सजन हैं..' या गाण्यावर ऐश्वर्या यांनी अविनाश यांच्या सोबतचे काही फोटो, रील्स यांचा कोलाज करुन तो शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिला कि त्यांच्यातील प्रेम, मैत्री ही सगळी नाती छान उलगडली जात आहेत. त्यामुळे नेटकरी सध्या त्यांच्या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पाडत आहेत.