'या' मराठी अभिनेत्रीला वाटते फटाक्यांची भीती, म्हणाली, "लहानपणी माझ्या ड्रेसमध्ये फटाका गेला अन्.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 18:42 IST2023-11-10T18:41:03+5:302023-11-10T18:42:27+5:30
Aishwarya shete: अलिकडेच या अभिनेत्रीने तिच्या लहानपणीचा किस्सा शेअर केला आहे.

'या' मराठी अभिनेत्रीला वाटते फटाक्यांची भीती, म्हणाली, "लहानपणी माझ्या ड्रेसमध्ये फटाका गेला अन्.."
दिवाळी म्हटलं की फराळ, दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी हे सारं काही आलं. मात्र, यात अनेकांना फटक्यांची प्रचंड भीती वाटते. विशेष म्हणजे फटाक्यांची भीती वाटण्यामागेही प्रत्येकाची वेगवेगळी कारण असतात. अशीच भीती रमा राघव या मालिकेतील एका अभिनेत्रीला वाटते. या अभिनेत्रीसोबत लहानपणी फार मोठा अपघात होता-होता टळला होता. त्यामुळे तिला फटाक्यांची भीती वाटते.
रमा राघव या मालिकेतील अभिनेत्री ऐश्वर्या शेटे हिने नुकतीच तिच्या दिवाळीच्या आठवण शेअर केली आहे. एकदा लहान असताना तिच्या कपड्यांमध्ये फटाक्यांमधील बटरफ्लाय गेलं होतं. तेव्हापासून तिला फटाक्यांची भीती वाटते.
"लहानपणी माझ्या कुटुंबात दिवाळीला तुळशीचं लग्न असायचं. सुरुवातीला आम्ही करत नव्हतो, पण शेजारी राहणाऱ्या माझ्या मावशीकडे तुळशीचा विवाह असायचा, म्हणून मी माझ्या आईलाही ते करायला पटवून दिलं. तेव्हापासून आम्ही दिवाळीला तुळशीविवाह मोठ्या उत्साहात साजरा करतो", असं ऐश्वर्या म्हणाली.
पुढे ती म्हणते, "दिवाळीचा एक किस्सा आहे, जेव्हा मला फटाक्यांची भीती वाटायची कारण कोणीतरी बटरफ्लाय लावला होता आणि तो माझ्या ड्रेसमध्ये शिरला. ही वाईट आठवण असूनही, हा एक मजेदार किस्सा आहे. " दरम्यान, ऐश्वर्या सध्या रमा राघव या मालिकेत रमा ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे.