विकी कौशलचा 'छावा' पाहून मराठी अभिनेत्री म्हणाली, "एकदा पाहण्यासारखा आहे पण..."

By ऋचा वझे | Updated: February 21, 2025 12:37 IST2025-02-21T12:37:27+5:302025-02-21T12:37:57+5:30

अभिनेत्रीला पटली नाही स्क्रीप्ट, तसंच म्हणाली, 'मराठीत संवाद इतके कमी का राव...?"

marathi actress akshata apte reviews chhaava movie praises vicky kaushal but says script is not that good | विकी कौशलचा 'छावा' पाहून मराठी अभिनेत्री म्हणाली, "एकदा पाहण्यासारखा आहे पण..."

विकी कौशलचा 'छावा' पाहून मराठी अभिनेत्री म्हणाली, "एकदा पाहण्यासारखा आहे पण..."

सध्या गाजत असलेल्या 'छावा' (Chhaava) सिनेमावर अनेकजण संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. विकी कौशलच्या अभिनयाचं भरभरुन कौतुक होत आहे. तर सिनेमाच्या संगीतावर मात्र जोरदार टीकाही होत आहे. इतिहास माहित असला तरी सिनेमाचा क्लायमॅक्स अंगावर काटा आणणारा आहे. दरम्यान एका मराठी अभिनेत्रीने 'छावा'पाहून मोठी पोस्ट केली आहे. यामध्ये तिने आवडलेल्या आणि खटकलेल्या गोष्टी सविस्तर सांगितल्या आहेत.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान मराठमोळी अभिनेत्री अक्षता आपटेने (Akshata Apte) सिनेमा पाहून तिचं निरीक्षण लिहिलं आहे. ती लिहिते, "छावा बद्दल...एकदा पाहण्यासारखा सिनेमा...पहिला हाफ....दुसरा हाफ मध्ये आग लावलीये. 

सिनेमाची सिनेमॅटोग्राफी चांगली आहे. स्क्रीप्ट मात्र आवडली नाही. संगीत तर अतिशय वाईट आहे. बॅकग्राऊंडला वाजणारं म्युझिक पहिल्या

हाफमध्ये सतत डिस्टर्ब करतं. अजिबातच खिळवून ठेवत नाही. दिग्दर्शन चांगलंही आहे पण काही ठिकाणी कमीही पडलंय. कॉस्च्युम आणि हेअर-मेकअप छान जमलंय. विकी कौशलला त्याच्या परफॉर्मसाटी खूप खूप प्रेम. अक्षय खन्नाही जबरदस्त आहे. रश्मिका मंदाना अजिबातच नको. सहकलाकारांचंही काम उत्तम आहे. "

एकंदर मनोरंजनासाठी चांगला सिनेमा बनवला आहे. पण अपेक्षा जरा जास्त होत्या. शंभूराजांच्या एकंदर कार्यकाळातील आणखी काही पैलू दाखवायला हवे होते. इतरांप्रमाणेच मलाही सिनेमाच्या शेवटी खूप रडू आलं. पण रडण्याचं कारण एकंदर सिनेमाचा प्रभाव म्हणून नाही तर संभाजी महाराजांसाठी आपल्या मनात जी आदराची भावना आहे यामुळे रडू आलं. दुर्दैवाने रश्मिकाच्या डायलॉग्समध्ये तिचा दाक्षिणात्य उच्चार स्पष्ट जाणवतो आणि तिचा इतर सिनेमांसारखा ठराविक अभिनय दिसून येतो. महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आपण तिला स्वीकारु शकत नाही. विकी कौशलने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलं आहे. पण स्क्रीप्ट आणखी चांगली असती तर विकीच्या आणखी बाजू आपल्याला दिसल्या असत्या. खूप कमी संवाद मराठीत ठेवलेत राव... त्यांनी मराठी डब का केला नाही? मराठी लोकांना आणखी कनेक्ट होता आलं असतं. 


 

अक्षता आपटे 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत आहे. अक्षता यावर्षी ग्नबंधनात अडकणार आहे. तिने २ वर्षांपूर्वी स्वानंद केतकरसोबत साखरपुडा केला. स्वानंद 'तू तेव्हा तशी' आणि '३६ गुणी जोडी' मालिकेत झळकला आहे. 

Web Title: marathi actress akshata apte reviews chhaava movie praises vicky kaushal but says script is not that good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.