Video: शारद सुंदर चंदेरी राती!! कोजागिरीच्या रात्री पाठकबाईंचा खुललं चंद्रासारखं रुप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 16:19 IST2023-10-29T16:18:43+5:302023-10-29T16:19:57+5:30
Akshaya deodhar: अक्षयाने कोजागिरी निमित्त खास व्हिडीओ शूट केलं असून तिच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

Video: शारद सुंदर चंदेरी राती!! कोजागिरीच्या रात्री पाठकबाईंचा खुललं चंद्रासारखं रुप
'तुझ्यात जीव रंगला' या गाजलेल्या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर (akshaya deodhar). गेल्या काही काळामध्ये अक्षयाचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय आहे. त्यामुळे कायम नवनवीन फोटो, व्हिडीओ पोस्ट करुन ती चर्चेत येत असते.
अक्षयाने कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने नुकतेच काही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले. अक्षयाने कोजागिरी निमित्त खास लूक केला होता. यावेळी तिने ऑफ व्हाइट रंगाची डिझायनर साडी नेसली होती. सोबतच त्याला साजेसा मेकअप आणि हेअरस्टाइल सुद्धा तिने केली आहे.
हा व्हिडीओ पोस्ट करत अक्षयाने बॅकग्राऊंडला शारद सुंदर चंदेरी राती हे आशा भोसले यांच्या आवाजातील गाणं प्ले केलं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ आणखीनच सुरेख वाटत आहे. सध्या तिच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडत आहेत.
दरम्यान, गेल्या काही काळापासून अक्षयाचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, त्यामागेदेखील एक खास कारण आहे. अलिकडेच हार्दिकने एका मुलाखतीत अक्षया सध्या पडद्यापासून दूर असण्यामागचं कारण सांगितलं.