अक्षयाचा बोल्ड लूक चर्चेत; डेनिम शर्ट परिधान करुन शेअर केले ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 15:34 IST2023-12-25T15:32:17+5:302023-12-25T15:34:32+5:30
Akshaya naik: अक्षयाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अक्षयाचा बोल्ड लूक चर्चेत; डेनिम शर्ट परिधान करुन शेअर केले ग्लॅमरस फोटो
'सुंदरा मनामध्ये भरली' या गाजलेल्या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक (akshaya naik). या मालिकेत लतिका ही भूमिका साकारुन ती घराघरात पोहोचली. अक्षया सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती सतत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या अक्षयाने पहिल्यांदाच बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. यातील काही निवडक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये ती कमालीची बोल्ड दिसत असून तिचा हा अंदाजही नेटकऱ्यांना आवडला आहे.
अक्षयाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने डेनिमचा शर्ट परिधान केला असून तिने बेडवर बसून काही हटके फोटोसाठी पोझ दिल्या आहेत. पहिल्यांदाच अक्षयाचा असा बोल्ड अंदाज पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. मात्र, तिचा लूक आणि खासकरुन तिचा कॉन्फिडन्स नेटकऱ्यांना विशेष भावला.
दरम्यान, यापूर्वीही अक्षयाने असंच एक फोटोशूट केलं होतं. त्याचीही चाहत्यांमध्ये चर्चा रंगली होती. सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका अलिकडेच संपली आहे. सध्या अक्षया चूकभूल द्यावी घ्यावी या नाटकाच्या माध्यमातून रंगमंचावर दिसून येत आहे.