भेटीची आस! प्रसाद जवादेने केलं होणाऱ्या बायकोचं स्वागत, अमृता म्हणाली, 'हा प्रेमाचा...'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 01:43 PM2023-10-12T13:43:32+5:302023-10-12T13:44:46+5:30
अमृता महिनाभर नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेला गेली होती.
मराठी कलाविश्वात अनेक क्युट जोड्या आहेत ज्या प्रेक्षकांच्या अत्यंत जवळच्या आहेत. त्यातील काहींची लग्नही झाली आहेत. तर काही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे प्रसाद जावडे (Prasad Jawade) आणि अमृता देशमुख (Amruta Deshmukh). बिंग बॉसमध्ये एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या या गोड जोडीचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला. तर आता ते लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दरम्यान अमृता महिनाभर नाटकाच्या दौऱ्यासाठी अमेरिकेला गेली होती. नुकतीच ती मुंबईत परत आली असून प्रसादने विमानतळावर कसं स्वागत केलं याची झलक तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवली आहे.
प्रसाद जावडे-अमृता देशमुख हे सध्या चाहत्यांचं लाडकं कपल आहे. त्यांनी आपल्या क्युटनेसने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. साखरपुड्याचे सुंदर फोटो, सोशल मीडियावरील त्यांचे क्युट व्हिडिओ सगळंच खूप गोड आहे. अमृता दीड महिना नाटकाच्या दौऱ्यासाठीअमेरिकेला जाणार म्हणल्यावर प्रसाद खूपच हळवा झाला होता. आता अखेर ती परत आली आहे. प्रसादने हातात फुगा घेऊन त्यावर वेलकम अमृता असं लिहून तिचं स्वागत केलं. अमृताने त्याचा व्हिडिओ शूट करत 'हा प्रेमाचा राग चांगलाय' असं कॅप्शन लिहिलंय. तसंच 'माझं सर्वात सुंदर स्वागत' असंही तिने म्हटलं आहे.
अमृताला सगळे बिग बॉसमुळे पुण्याची टॉकरवडी म्हणतात. ती सध्या संकर्षण कऱ्हाडेसोबत 'नियम व अटी लागू' नाटकात काम करत आहे. तर प्रसाद 'काव्यांजली' मालिकेत मुख्य भूमिका साकारत होता. मात्र नुकतंच त्याने ही मालिका सोडली. दोघं कधी लग्न करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.