Amruta Khanvilkar : तुला घाम येतो का? विचित्र प्रश्नावर अमृता खानविलकरचं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 03:32 PM2022-07-31T15:32:19+5:302022-07-31T15:34:53+5:30
Amruta Khanvilkar in Bas Bai Bas : अमृता जिथे जाईल तिथे माहौल करते. इव्हेंट कुठलाही असो सर्वांच्या नजरा अमृतावर रोखल्या जातात. याच अमृताला घाम येत असेल का? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?
महाराष्ट्राची ‘चंद्रा’ अर्थात मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिची बातच न्यारी. चाहते अगदी तिच्यावर फिदा आहेत. मनमोहक सौंदर्य, दमदार अभिनय आणि मंत्रमुग्ध करणारं नृत्य यासाठी ती ओळखली जाते. तिची स्टाईल स्टेटमेंटही भारी आहे. त्यामुळे अमृता जिथे जाईल तिथे माहौल करते. इव्हेंट कुठलाही असो अमृतावर सर्वांच्या नजरा रोखल्या जातात. याच अमृताला घाम येत असेल का? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? प्रश्न वाचून हसू आलं ना! पण ‘बस बाई बस’ (Bas Bai Bas) या झी मराठीच्या शोमध्ये एका महिलेने अमृताला नेमका हाच प्रश्न विचारला आणि अमृताने त्यावर भन्नाट उत्तर दिलं.
झी मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बस बाई बस’ या शोच्या दुसऱ्या भागात अमृता खानविलकर सहभागी झाली होती. या कार्यक्रमात एका महिलेने अमृताला विचित्र प्रश्न विचारला. तुम्हाला घाम येतो का? असा हा प्रश्न होता. महिलेचा प्रश्न ऐकून सगळ्यांनाच हसू आवरेना. अमृताला तर काय बोलावं हेच कळेना. पण उत्तर तर द्यावच लागणार. तिने या प्रश्नावर भन्नाट उत्तर दिलं.
‘ तू हा मला प्रश्न विचारलंस हे तर ठीक आहे. पण नंतर यावर मिम्स किती तयार होणार याची तुला कल्पनासुद्धा नाहीये,’अशी सुरूवात करत अमृता यावर म्हणाली, ‘अभिनेत्री असले तरी मी एक माणूस आहे. त्यामुळे हो, मलासुद्धा घाम येतो. पण शूटिंगदरम्यान किंवा मग आम्ही अनेक कार्यक्रमाला जातो, जे काही... तिकडे मी माझा छोटा फॅन कॅरी करते. आणि मुंबईसारख्या ठिकाणी अगं राजा कुठूनही आलेल्या माणसाला घाम येतोच....’
अमृता नुकतीच ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात झळकली होती. तिच्यासोबत आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट आणि यातील गाणी तुफान गाजलीत. चर्चा खरी मानाल तर ‘झलक दिखला जा 10’मध्ये अमृता सहभागी होणार आहे. याआधी ती ‘नच बलिये’ या शोमध्ये सहभागी झाली होती आणि हा शो तिने जिंकलाह होता.