'ड्रीम गर्ल'सोबत झळकणार 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री! अनघा भगरेचं स्वप्न पूर्ण, म्हणाली-
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 13:33 IST2024-09-24T13:33:15+5:302024-09-24T13:33:45+5:30
रंग माझा वेगळा फेम मराठी अभिनेत्रीला सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनींसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळालीय (rang maza vegla,

'ड्रीम गर्ल'सोबत झळकणार 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री! अनघा भगरेचं स्वप्न पूर्ण, म्हणाली-
हेमा मालिनी या बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना. आजही जन्माष्टमीला हेमा मालिनींचा नृत्याविष्कार पाहून आपण थक्क होतो. हेमा मालिनींचे सिनेमे आजही आपलं तितकंच मनोरंजन करतात. हेमा मालिनींसारख्या दिग्गज अभिनेत्रीसोबत काम करणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री अनघा भगरेचं हेमा मालिनींसोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण झालं असून तिने सोशल मीडियावर पोस्ट करुन आनंद व्यक्त केलाय.
अनघा भगरे हेमा मालिनींसोबत झळकणार
अनघा भगरेने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. या फोटोत तिने बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनींसोबत फोटोशूट केलंय. हेमा मालिनींसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करुन अनघा भगरेने खास कॅप्शन लिहिलंय. अनघा लिहिते, "ड्रीम गर्लसोबत काम करण्याचं स्वप्न सत्यात उतरलं" अशा शब्दात तिने मनातल्या भावना व्यक्त केल्यात. अनघा हेमा मालिनींसोबत एका जाहिरातीत काम करण्याची शक्यता आहे.
काहीच दिवसांपूर्वी अनघाने केलं बिग बींसोबत काम
अनघा भगरेने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. KBC च्या नवीन सीझनचा हा व्हिडीओ असलेला दिसून येतो. व्हिडीओत पाहायला मिळतं की, नोकरीतून निवृत्त झालेला बँक मॅनेजर कॅब चालवतो. तो कॅब बंद करुन घरी येतो. तेव्हा त्याची मुलं त्याला प्रश्न विचारतात. तुम्ही हे का करताय? लोक काय म्हणतील असा प्रश्न ते बाबांना विचारतात. तेव्हा बाबा एका उत्तराने त्यांना शांत करतात. नंतर अमितााभ बच्चन यांची जाहिरातीत एन्ट्री होते. अशाप्रकारे अनघाला अमिताभ यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली आहे. आधी अमिताभ बच्चन अन् आता हेमा मालिनींसोबत काम करायला मिळाल्याने अनघा नक्कीच आनंदी असेल यात शंका नाही.