Video: 'तुझ्या कानातही कुडी..'; मराठी गाण्यावरील अरुंधतीच्या अदा पाहून व्हाल घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 02:45 PM2022-05-05T14:45:26+5:302022-05-05T14:46:03+5:30

Madhurani gokhale: अलिकडेच मधुराणीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने मराठी गाण्यावर तिचा मराठमोळा लूक चाहत्यांना दाखवला आहे.

marathi actress arundhati aka madhurani gokhale share marathi song video | Video: 'तुझ्या कानातही कुडी..'; मराठी गाण्यावरील अरुंधतीच्या अदा पाहून व्हाल घायाळ

Video: 'तुझ्या कानातही कुडी..'; मराठी गाण्यावरील अरुंधतीच्या अदा पाहून व्हाल घायाळ

googlenewsNext

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले- प्रभुलकर (madhurani gokhale-prabhulkar). या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारुन तिने विशेष लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळेच तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत तिच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेण्यासाठीही नेटकरी उत्सुक असतात. त्यामुळेच मधुराणीदेखील सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत चागत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

अलिकडेच मधुराणीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने मराठी गाण्यावर तिचा मराठमोळा लूक चाहत्यांना दाखवला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमधील तिचं स्मित हास्य, नजाकती यांमुळे नेटकरी पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत.

दरम्यान, 'तुझ्या कानातही कुडी, त्यात पैठणी साडी' या गाण्यावर तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे. सध्या मधुराणी आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातुन तुफान लोकप्रियता मिळवत आहे. या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर कायम मधुराणीचीच चर्चा असते.

Web Title: marathi actress arundhati aka madhurani gokhale share marathi song video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.