राणी मुखर्जीच्या गाण्यावर अश्विनी कासारचे भन्नाट एक्स्प्रेशन्स; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 16:22 IST2023-12-05T16:16:33+5:302023-12-05T16:22:45+5:30
Ashvini kasar: अश्विनीचा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

राणी मुखर्जीच्या गाण्यावर अश्विनी कासारचे भन्नाट एक्स्प्रेशन्स; व्हिडीओ व्हायरल
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी कासार (ashwini kasar). अनेक गाजलेल्या मालिका आणि सिनेमांमध्ये झळकलेली अश्विनी सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर ती काही ना काही व्हिडीओ, फोटो शेअर करत असते. सध्या असाच तिचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
अश्विनी बऱ्याचदा अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (aishwarya narkar) किंवा अविनाश नारकर (avinash narkar) यांच्यासोबतचे भन्नाट रिल्स शेअर करत असते. यावेळी सुद्धा तिने असंच एक रील शेअर केलं आहे. अश्विनीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने राणी मुखर्जीच्या 'लागा चुनिरी में दाग' या सिनेमातील 'हम तो एैसे हैं भैय्या' या गाण्यावर रील केलं.
आहे.
या गाण्यावर अश्विनीने दिलेले एक्स्प्रेशन्स जबरदस्त असून सेलिब्रिटींसह नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे तिच्याप्रमाणेच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनीही सेम गाण्यावर रील शेअर केलं आहे.