'आई कुठे काय करते 'फेम अनघाने केले वडिलांचे स्वप्न साकार; शेअर केली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 12:00 PM2022-12-30T12:00:08+5:302022-12-30T12:05:21+5:30

'आई कुठे काय करते' फेम अनघा म्हणजेच अभिनेत्री 'आश्विनी महांगडे' (Ashwini Mahangade) आपल्या उत्तम अभिनयामुळे घराघरात पोहोचली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आहे.

marathi-actress-ashwini-mahangade-buy-a-car-fulfilled-her-father's-dream | 'आई कुठे काय करते 'फेम अनघाने केले वडिलांचे स्वप्न साकार; शेअर केली भावूक पोस्ट

'आई कुठे काय करते 'फेम अनघाने केले वडिलांचे स्वप्न साकार; शेअर केली भावूक पोस्ट

googlenewsNext

'आई कुठे काय करते' फेम अनघा म्हणजेच अभिनेत्री 'आश्विनी महांगडे' (Ashwini Mahangade) आपल्या उत्तम अभिनयामुळे घराघरात पोहोचली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आहे. दीड वर्षांपूर्वी अश्विनीच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांचे राहिलेले स्वप्न आता अश्विनीने पूर्ण केले आहे. याचाच आनंद व्यक्त करत तिने पोस्ट शेअर केली आहे.

अश्विनी सोशल मीडियावर सतत फोटो व्हिडिओ पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वी तिने आईसाठी केलेली पोस्ट चर्चेत आली होती. आता तिने आणखी एक पोस्ट शएअर करत आनंदाची बातमी दिली आहे. अश्विनीनं स्वत:ची नवी गाडी घेतली आहे. लाल रंगाच्या एक्सयुव्ही (XUV) सोबत अश्विनीने फोटो शेअर केला आहे. याखाली तिने कॅप्शन लिहिले, ' कष्टाचे फळ एक ना एक दिवस मिळतेच. स्वकष्टाचं फळ, नानांचा आशिर्वाद, स्वप्न साकार, माय एंजल एमएच ११ सीजे ००८८, NOW I AM ALSO GOING TO FLY'

याखाली तिने हॅशटॅग नानांचे स्वप्न असे कॅप्शन दिले आहे. सरत्या वर्षात अश्विनीने आपल्या दिवगंत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले असून तोच आनंद तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

दरम्यान, अश्विनीच्या पोस्टवर मराठी कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोत अश्विनीने नव्वारी नेसली आहे ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. यावर ऋतुजा बागवे, अभिषेक देशमुख, ऋतुजा जुन्नरकर या कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय नवीन गाडी घेतल्यानंतरचा एक व्हिडिओ सुद्धा तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

अश्विनी खूपच साध्या आणि मध्यमवर्गीय कुटुंबातून आली आहे. तिचे वडिल ज्यांना ती नाना म्हणायची ते शेतकरी होते. वडील गेल्यानंतर अश्विनीनेच शेतीची जबाबदारी घेतली. त्यावेळी तिने भावूक होत लिहिले होते, 'काही आठवणी जबाबदारीची जाणीव करुन देतात.त्यातलीच एक आठवण आहे हळदीची लागवड आणि भुईमूग काढणी. नानांचं हळदीवर विशेष प्रेम होतं. माझ्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट मला त्यांची आठवण करुन देते. आयुष्यात येईल त्या परिस्थितीचा सामना करता आला पाहिजे ही त्यांची शिकवण कायम लक्षात राहील.'

Web Title: marathi-actress-ashwini-mahangade-buy-a-car-fulfilled-her-father's-dream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.