"पंचेचाळीशी नंतर एखादी स्त्री योग करायला जाते तेव्हा.."; भार्गवी चिरमुलेने महिलांसाठी सांगितली महत्वाची गोष्ट

By देवेंद्र जाधव | Updated: March 20, 2025 13:30 IST2025-03-20T13:30:01+5:302025-03-20T13:30:53+5:30

अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने महिलांच्या आरोग्याविषयी महत्वाची गोष्ट सांगितली असून प्रत्येक स्त्रीने ती वाचावी (bhargavi chirmule)

marathi actress Bhargavi Chirmule tells an important story for women health | "पंचेचाळीशी नंतर एखादी स्त्री योग करायला जाते तेव्हा.."; भार्गवी चिरमुलेने महिलांसाठी सांगितली महत्वाची गोष्ट

"पंचेचाळीशी नंतर एखादी स्त्री योग करायला जाते तेव्हा.."; भार्गवी चिरमुलेने महिलांसाठी सांगितली महत्वाची गोष्ट

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना भार्गवी चिरमुलेनेमहिला त्यांच्या आरोग्याकडे कसं दुर्लक्ष करतात याविषयी खुलासा केलाय. मराठी मनोरंजन विश्व या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत भार्गवी म्हणाली की, "लग्न झाल्यावर नवीन आयुष्य असतं. मग प्रेग्नंसी येते. पुढे बाळाचं संगोपन असतं. त्यानंतर मुलं १०-१२ वीला गेली की आईला त्यांच्या परीक्षेचं टेंशन असतं. या सगळ्या स्टेजमधून बाई जात होते."

"यावेळी अनेकदा तिची इमोशनली बाजू वर-खाली होत असते. पण या सगळ्यात बाई कोणत्या गोष्टीकडे जास्त दुर्लक्ष करते तर ते तिच्या तब्येतीकडे. मुलगा दूध पितोय ना, नवरा औषध घेतोय ना, सासू-सासऱ्यांची देखभाल वगैरे बघताना ती स्वतः तिच्या तब्येतीसाठी काय करते. बाईला अस्वस्थपणा वाटत असेल, कोणत्या गोष्टीचं टेंशन असेल तर दोन दिवस बाई शांत बसते का? ती डॉक्टरकडे जाते का? खूप कमी वेळा बाई डॉक्टरकडे जाते."

"फक्त प्रेग्नंसीच्या काळात आणि बाळ झाल्यानंतर बाई डॉक्टरांकडे जाते. पण त्यानंतर ती सहसा डॉक्टरकडे जात नाही. कामाचं आणि मुलांचं प्रेशर ती छान हसतहसत सांभाळत असते. याचं एक कारण म्हणजे बाई ही मल्टिटास्किंग उत्तम करते. ती एकावेळी अनेक कामं करत असल्याने तिच्यावर खूप लादलं जातं. पण या सर्वात बाई स्वतःकडे दुर्लक्ष करते."

"त्यामुळे ज्याक्षणी पहिल्यांदा ती बेल वाजेल त्याक्षणी तुमच्या बेस्ट फ्रेंडशी तरी बोला. अशा फ्रेंडशी बोला जी काहीतरी उपाय सांगेल. तुमचा त्रास ऐकून ती योग्य ठिकाणी तुम्हाला घेऊन जाईल. उगाचच व्हॉट्सअॅपवर चर्चा करण्यात अर्थ नाही. एखादा डॉक्टर, गायनोकॉलॉजिस्ट तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील. औषधं देतील. मला असं वाटतं स्त्री ही स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे अजिबात लक्ष देत नाही."

"मग पंचेचाळीशी नंतर अचानक तिला झुंबा करायचा असतो, योगा करायचा असतो जे तिला अजिबात जमत नाही. आधी मुलांमुळे आणि नवऱ्यामुळे जमत नाही अशी कारणं ती देते. पण जेव्हा ती अशा गोष्टी करायला लागते तेव्हा तिचं शरीर तिला साथ देत नाही. त्यामुळे पैसा कमवणं गरजेचं आहे. पण स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. कोविडमध्ये तब्येत किती महत्वाची हे आपल्याला निसर्गाने दाखवलंय. आजही आपल्या समाजात डिप्रेशन म्हणजे काय हे कोणाला माहिती नाही. हा रोग आहे या अँगलने त्याकडे बघितलं जात नाही. त्यामुळे कोणाशीतरी छान बोला आणि मग उपाय शोधण्याचा प्रयत्न करा."

Web Title: marathi actress Bhargavi Chirmule tells an important story for women health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.