मराठी अभिनेत्रींचा भन्नाट स्वॅग; थलपती विजयच्या Halamithi Habibo वर केला भन्नाट डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 12:02 IST2022-04-06T11:58:29+5:302022-04-06T12:02:10+5:30
Halamithi Habibo song: या गाण्यावर आतापर्यंत सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी व्हिडीओ शूट करुन ते शेअर केले आहेत.

मराठी अभिनेत्रींचा भन्नाट स्वॅग; थलपती विजयच्या Halamithi Habibo वर केला भन्नाट डान्स
दाक्षिणात्य कलाविश्वातील सुपरस्टार थलपती विजय यांची तरुणाईमध्ये विशेष क्रेझ आहे. उत्तम अभिनय आणि हटके स्टाइल यामुळे थलपती विजय (thalapathy vijay) कायम चर्चेत असतो. अलिकडेच त्याचं 'मल्लम्मा पिता पिता दे' हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे हे गाणं रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. या गाण्यावर आतापर्यंत सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी व्हिडीओ शूट करुन ते शेअर केले आहेत. यामध्येच आता मराठमोळ्या अभिनेत्रींनाही या गाण्यावर इन्स्टा रिल करण्याचा मोह आवरला नाही.
सध्या सोशल मीडियावर काही मराठी अभिनेत्रींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकरने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये सगळ्या अभिनेत्री चक्क नऊवारी साडी नेसून मराठमोळ साजशृंगार करुन 'मल्लम्मा पिता पिता दे' वर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत.
दरम्यान, या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओ असंख्य लाइक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत. तसंच या गाण्यावर यापूर्वीही रेश्मा शिंदे, आणि तिच्याप्रमाणेच अनेक कलाकारांनी व्हिडीओ शेअर केले आहेत.