जिंकलंस पोरी! मराठमोळ्या अभिनेत्रीने केला 'गजगामिनी वॉक', आदिती राव हैदरीशी होतेय तुलना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 03:26 PM2024-05-31T15:26:24+5:302024-05-31T15:27:12+5:30

हा ट्रेंड तूच जिंकलीस! नेटकऱ्यांच्या भरभरुन कमेंट्स

marathi actress follows trend of Gajagamini walk netizens says you are winner | जिंकलंस पोरी! मराठमोळ्या अभिनेत्रीने केला 'गजगामिनी वॉक', आदिती राव हैदरीशी होतेय तुलना

जिंकलंस पोरी! मराठमोळ्या अभिनेत्रीने केला 'गजगामिनी वॉक', आदिती राव हैदरीशी होतेय तुलना

सध्या सोशल मीडियावर 'गजगामिनी वॉक'चा ट्रेंड आहे. संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' या नुकत्याच रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये आदिती राव हैदरीने 'गजगामिनी वॉक' केला आहे जो खूपच व्हायरल होतोय. अनेक नेटकरी यावर रील बनवत आहेत. यामध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीने बाजी मारली आहे. जिथे इतर जणांना हा वॉक अजिबातच जमत नाही तिथे या अभिनेत्रीने अगदी हुबेहूब करुन दाखवला आहे. बघा व्हिडिओ.

बघावं तिकडे सध्या 'हीरामंडी'च दिसून येत आहे. हीरामंडी चे डायलॉग्स, गाणी, अभिनेत्रींचे आऊटफिट सगळंच लोक कॉपी करत आहेत. त्यातच आदिती राव हैदरीचा 'गजगामिनी वॉक'. या डान्स स्टेपने अक्षरश: वेड लावलं आहे. पण मराठमोळी अभिनेत्री कांची शिंदेने (Kanchi Shinde) अगदी हुबेहूब गजगामिनी वॉक करत अनेकांना सुखद धक्काच दिलाय. इतकंच नाही तर तिने बिब्बोजानसारखाच पेहरावही केला आहे. यात ती अत्यंत सुंदर दिसत आहे. शिवाय तिला ही गजगामिनी चालही जमली आहे. त्यामुळे सगळेच तिचं कौतुक करत आहे. कांचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून थेट आदिती राव हैदरीशी तिची तुलना होत आहे.

कांचीच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस आहे. 'हा ट्रेंड तू जिंकलीस','सुरुवातीला पाहिलं तर आदितीच वाटली','गजगामिनी ट्रेंडची विजेती' अशा कमेंट्स तिच्या रीलवर आल्या आहेत.  कांची सध्या कलर्स मराठीवरील 'पिरतीचा वणवा उरी पेटला' मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. कांची अभिनयासोबतच उत्तम लावणी डान्सरही आहे.

Web Title: marathi actress follows trend of Gajagamini walk netizens says you are winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.