'शुभविवाह'मध्ये गार्गी थित्तेची एन्ट्री; साकारणार 'ही' महत्त्वपूर्ण भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 17:10 IST2023-12-14T17:10:22+5:302023-12-14T17:10:40+5:30
Gargi thatte: अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये झळकल्यानंतर गार्गी थत्ते शुभविवाह मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

'शुभविवाह'मध्ये गार्गी थित्तेची एन्ट्री; साकारणार 'ही' महत्त्वपूर्ण भूमिका
उत्तम अभिनयकौशल्य आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणजे गार्गी फुले-थत्ते. राजा रानीची गं जोडी, तुला पाहते रे, सुंदरा मनामध्ये भरली अशा कितीतरी गाजलेल्या मालिकांमध्ये गार्गी यांनी काम केलं आहे. विशेष म्हणजे निळू फुले यांची लेक आपल्या सहजसुंदर अभिनयातून प्रेक्षकांना कायमच आपलंसं करत असते. त्यामुळे तिच्या एन्ट्रीमुळे अनेक मालिका गाजतात. यामध्येच आता गार्गी स्टार प्रवाहवरील एका मालिकेत झळकणार आहेत.
'सिरीअल जत्रा' या इन्स्टाग्राम पेजवर एका मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यात या मालिकेत गार्गी थत्ते महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं दिसून येत आहे. सध्या छोट्या पडद्यावर शुभविवाह ही मालिका गाजत आहे. मधुरा देशपांडे आणि यशोमन आपटे यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेत गार्गी थत्ते यांची एन्ट्री होणार आहे.
शुभविवाह या मालिकेत गार्गी या सावित्री मनोहर शिंदे ही भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. आकाश आणि भूमी त्यांचं घर सोडून बाहेर पडले आहेत. त्यामुळे ते आसरा मागण्यासाठी सावित्रीबाईंकडे जातात. मात्र, त्या त्यांना आसरा देण्यास नकार देतात.
दरम्यान, आता या मालिकेतील सावित्रीचा आणि भूमीचा काय संबंध? ती नेमकी कोण आहे हे मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे.