गौतमी देशपांडेचंही ठरलं? मृण्मयीच्या सोशल मीडिया पोस्टवरुन चाहत्यांना मिळाली हिंट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 10:48 AM2023-12-23T10:48:03+5:302023-12-23T10:48:30+5:30
मृण्मयीच्या लेटेस्ट सोशल मीडिया पोस्टवरुन गौतमीचं ठरलंय असा अंदाज व्यक्त केला जातोय.
'माझा होशील ना' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. याचं कारणही खास आहे ते म्हणजे गौतमी लग्न करतेय? अशा चर्चांना उधाण आलंय. काही दिवसांपूर्वीच गौतमी आणि तिची बहीण अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा (Mrunmayee Deshpande) एका लग्नातील फोटो समोर आला होता. दोघींनी त्यात सारखीच निळ्या रंगाची साडी नेसली होती. यामध्ये मृण्मयी तिच्या नवऱ्यासोबत तर गौतमीसोबत 'भाडिपा' फेम स्वानंद तेंडुलकर उभा होता. तेव्हापासूनच गौतमी आणि स्वानंदचं काही चालू आहे का या चर्चा सुरु झाल्या होत्या. आता मृण्मयीच्या लेटेस्ट सोशल मीडिया पोस्टवरुन गौतमीचं ठरलंय असा अंदाज व्यक्त केला जातोय.
सध्या मराठी सिनेसृष्टीतील कलाकार लग्नाच्या गाठी बांधत चाहत्यांना सरप्राईज करत आहेत. प्रसाद-अमृताची जोडी असो किंवा मुग्धा-प्रथमेश असो. आता गौतमी देशपांडेच्याही घरी सनई चौघडे वाजतात की काय अशी शंका आहे. नुकतंच मृण्मयीने पुन्हा दोघींचा निळ्या साडीतील फोटो स्टोरीमध्ये पोस्ट केला आणि 'hmmm' असं कॅप्शन दिलं. तर दोघी एकमेकींकडे बघत हसतानाचाही एक फोटो तिने शेअर केला असून त्यावर 'काय वाटतंय' असं कॅप्शन दिलं. याशिवाय पुण्यातील लक्ष्मी रोडवर फिरताना नारळ पाणी पितानाताचा फोटो तिने पोस्ट केला आहे.
तर आता तिने घरात पंगतीची तयारी करतानाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. याला तिने 'तयारी' असं कॅप्शनही दिलंय. या सगळ्या हिंटवरुन गौतमीचं ठरलंय अशीच शंका चाहत्यांना आली आहे.
मृण्मयीच्या पोस्टवर चाहत्यांनी 'गौतमी आणि स्वानंदचं लग्न जमलं','गौतमी लग्न करतेय?' अशा कमेंट्स केल्या आहेत. अर्थात दोघी बहिणींनी अद्याप काहीही स्पष्ट सांगितलेलं नाही. पण त्यांच्या पुण्यातील घरी लग्नाचीच लगबग सुरु असल्याचं दिसतंय.
वर्कफ्रंट
गौतमीचं 'गालिब' हे नवीन नाटक नुकतंच सुरु झालं आहे. यामध्ये तिच्यासोबत तिचा पहिला सहकलाकार विराजस कुलकर्णी दिसत आह तर चिन्मय मांडलेकरने लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. दुसरीकडे मृण्मयी नुकतीच 'मुंबई डायरीज 2' या हिंदी वेबसिरीजमध्ये झळकली. तर सा रे ग म प लिटिल चॅम्प्सचं सूत्रसंचालनही तिने केलं.