'रडत रडत आईला फोन केला अन्..'; गौतमी देशपांडेच्या पहिल्या फिस्कटलेल्या पदार्थाचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 03:18 PM2022-05-19T15:18:04+5:302022-05-19T15:18:25+5:30

Gautami Deshpande: गौतमी लवकरच झी मराठीवरील किचन कल्लाकार या शोमध्ये सहभागी होणार आहे. यावेळी तिने एक मजेदार किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला.

marathi actress Gautami Deshpande shares her first food making experience | 'रडत रडत आईला फोन केला अन्..'; गौतमी देशपांडेच्या पहिल्या फिस्कटलेल्या पदार्थाचा किस्सा

'रडत रडत आईला फोन केला अन्..'; गौतमी देशपांडेच्या पहिल्या फिस्कटलेल्या पदार्थाचा किस्सा

googlenewsNext

उत्तम अभिनयाच्या जोरावर अल्पावधीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे.  'सारे तुझ्याचसाठी' या मालिकेतून गौतमीने कलाविश्वात पदार्पण केलं. या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या गौतमीला 'माझा होशील ना' या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेमुळेच तिच्या लोकप्रियतेतही भर पडली. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. गौतमी लवकरच झी मराठीवरील किचन कल्लाकार या शोमध्ये सहभागी होणार आहे. यावेळी तिने एक मजेदार किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला.

सध्या सोशल मीडियावर किचन कल्लाकार या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये गौतमी देशपांडे, गायत्री दातार आणि शिवानी बावकर या अभिनेत्री हजेरी लावणार आहेत. यावेळी तिघींनीही त्यांच्या पहिल्या कुकिंगचा अनुभव शेअर केला. यामध्ये पहिला पदार्थ करताना कशी फजिती झाली होती हे गौतमीने सांगितलं.
पहिल्यांदाच पोळ्या करायला गेलेल्या गौतमीने पिठात जास्त पाणी टाकल्यामुळे त्याची काय अवस्था झाली हे सांगितलं. "एकदा पीठ मळताना माझ्या हातून पाणी जास्त पडलं. त्यामुळे ते पीठ इतकं पातळ झालं की काही केल्या ते नीट होईना. शेवटी  मग मी रडत रडत आईला फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यावर आईने त्यात पीठ घालायला सांगितलं. पण, पीठ-पाणी, पाणी-पीठ करत ती सगळी कणिक फिसकटूनच गेली, असं गौतमी म्हणाली.
दरम्यान, या भागात गौतमीसह शिवानी आणि गायत्रीदेखील त्यांचे भन्नाट किस्से शेअर करतात. मात्र, या तिघी जणी कोणता पदार्थ करतात हे या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे.
 

Web Title: marathi actress Gautami Deshpande shares her first food making experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.