"लोक त्यांना वाटेल तिथे कचरा टाकतात आणि मग...", जुई गडकरी भडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 10:28 AM2024-01-21T10:28:19+5:302024-01-21T10:28:50+5:30

रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांची जुई गडकरीने केली कानउघाडणी, म्हणाली, "निर्सगाची काळजी घ्या..."

marathi actress jui gadkari shared video of people throwing garbage on tourist places | "लोक त्यांना वाटेल तिथे कचरा टाकतात आणि मग...", जुई गडकरी भडकली

"लोक त्यांना वाटेल तिथे कचरा टाकतात आणि मग...", जुई गडकरी भडकली

'पुढचं पाऊल' या लोकप्रिय मालिकेतून मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी घराघरात पोहोचली. या मालिकेमुळे जुई प्रसिद्धीझोतात आली. उत्तम अभिनय आणि कठीण परिश्रमाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकून घेणाऱ्या जुईने अल्पावधीतच कलाविश्वात जम बसवला. जुईचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या जुईच्या अशाच एका पोस्टची चर्चा रंगली आहे. 

जुईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत नदीच्या आजूबाजूला लोकांनी प्लास्टिक बॉटल आणि कचरा टाकल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत जुईने रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांची कानउघाडणी केली आहे.  "देवाने सुंदर निसर्ग बनवला. सुंदर प्राणी आणि पक्षी बनवले. खूप छान छान गोष्टींची निर्मिती केली आणि त्यानंतर देवाने माणूस बनवला," असं व्हिडिओत जुई म्हणताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत जुईने कचरा न टाकण्याचं आवाहन लोकांना केलं आहे. 

"कचरा टाकू नका. चांगले पर्यटक, चांगले नागरिक आणि चांगला माणूस व्हा. निर्सगाची काळजी घ्या...तरच निसर्ग आपली काळजी घेईल...लोक त्यांना वाटेल तिथे कचरा टाकतात, हे मी अनेकदा पाहिलं आहे. कचरापेटीत कचरा तुम्ही का टाकू शकत नाही? अशा सुंदर जागा प्लास्टिक बॉटल आणि कचऱ्याने भरलेल्या पाहून दु:ख होतं. जरा संवेदनशीलपणे वागा किंवा मग अशा ठिकाणी जाऊच नका. कचरा इतरत्र टाकणं थांबवता येत नसेल तर प्लीज आपल्या घरात तो अवश्य फेका आणि त्यातच राहा," असं म्हणत जुईने रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. 

जुईच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. सध्या जुई स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

Web Title: marathi actress jui gadkari shared video of people throwing garbage on tourist places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.