चिरतरुण राहण्यासाठी 'हा' प्रसिद्ध दिग्दर्शक घेतो गोळ्या?; क्रांती रेडकरने केला मजेशीर खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 16:36 IST2023-09-03T16:35:44+5:302023-09-03T16:36:18+5:30

Kranti redkar: क्रांती तिच्या सोशल मीडियावर बऱ्याचदा असे मजेशीर व्हिडीओ किंवा रिल्स शेअर करत असते.

marathi-actress-kranti-redkar-share-new-video-with-abhijit-panse- | चिरतरुण राहण्यासाठी 'हा' प्रसिद्ध दिग्दर्शक घेतो गोळ्या?; क्रांती रेडकरने केला मजेशीर खुलासा

चिरतरुण राहण्यासाठी 'हा' प्रसिद्ध दिग्दर्शक घेतो गोळ्या?; क्रांती रेडकरने केला मजेशीर खुलासा

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर (kranti redkar). गेल्या काही काळात क्रांतीचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे. बरेचदा ती इन्स्टाग्रामवर काही मजेशीर व्हिडीओ पोस्ट करत असते. यावेळीही तिने असाच एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक अभिजीत पानेस यांच्याविषयी भाष्य केलं आहे.

क्रांती सध्या ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका पार पाडत आहे. या कार्यक्रमात तिच्यासोबत दिग्दर्शक, लेखक अभिजीत पानसे आणि लावणीकिंग आशिष पाटील हे दोघदेखील परीक्षक पदाची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. विशेष म्हणजे क्रांती या दोघांसोबत काही फनी व्हिडीओ शेअर करत असते. यावेळी तिने अभिजीत पानसेसोबत व्हिडीओ शेअर केला आहे.

“मी माझ्या व्हिटॅमिनच्या गोळ्या खाल्ल्या तर लगेच याने काही गरज नसताना स्वतःच्या गोळ्या मागवून घेतल्या. आता असं दाखवतोय त्याचं लक्ष नाहीये. पण त्याचे कान माझ्याकडेच आहेत. हे सगळं वयामुळे होतंय. वय झाल्यामुळे आता तरुण राहण्यासाठी गोळ्या खातोय. त्याला आता बोलायचं आहे. माझा अपमान करायचा आहे. पण ते तो करत नाहीये. मला काहीच फरक नाही पडत. तुमच्याकडे माझं लक्षच नाहीये, असं तो दाखवतोय, ” असं क्रांती या व्हिडीओमध्ये म्हणते.

क्रांतीचं हे बोलणं झाल्यानंतर लगेच त्यावर अभिजीत पानसे त्यांची रिअॅक्शन देतात. हा तो क्रांतीचा प्रॉब्लेम आहेच. पण, काळजी करु नकोस. मी तिला शिकवतो. ती आता व्यवस्थित करतीये. दिग्दर्शनात पडली ठीक आहे रे.  रेनबो वगैरे ठीक आहे. मी तिला मार्गदर्शन केलं होतं. आता ती माझ्याबरोबर काम करतीये. ते फॉलोअर्स वगैरे तिच्या रिल्सचे आहेत. बाकी सगळ्याबाबतीत ती मलाच फॉलो करते. आता चिचं यश खूप मोठं आहे.
 

Web Title: marathi-actress-kranti-redkar-share-new-video-with-abhijit-panse-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.