सई ताम्हणकरनंतर शेवंता झाली मुंबईकर; अभिनेत्री कृतिका तुळसकरने घेतलं हक्काचं घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 12:06 IST2023-09-04T12:03:31+5:302023-09-04T12:06:48+5:30
Krutika tulaskar: कृतिकाने रात्रीस खेळ चाले ३ मध्ये शेवंताची भूमिका साकारली आहे.

सई ताम्हणकरनंतर शेवंता झाली मुंबईकर; अभिनेत्री कृतिका तुळसकरने घेतलं हक्काचं घर
सध्या मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार त्यांचं हक्काचं घर घेताना दिसत आहेत. सई ताम्हणकर, मीरा जोशी, ऋतुजा बागवे, प्राजक्ता माळी अशा कितीतरी गाजलेल्या अभिनेत्रींनी स्वत:चं घर घेतलं आहे. या अभिनेत्रींनंतर आता रात्रीस खेळ चालेची शेवंता म्हणजेच अभिनेत्री कृतिका तुळसकर (Krutika tulaskar) हिने स्वत:चं घर खरेदी केलं आहे.
कृतिकाने सोशल मीडियावर तिच्या नवीन घराचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती आणि तिचा नवरा वास्तुशांतीची पूजा करताना दिसत आहेत. सोबतच कृतिकाने मुंबईत घर घेण्याचा प्रवास कसा होता हे सांगितलं आहे.
"मुंबईत आल्यानंतर पेइंग गेस्ट ते भाड़याचं घर ते स्वतःच घर यात खुप मोठा काळ होता . पुजेला बसल्यावर त्या सर्व प्रवासावर एक नजर फिरवली तेव्हा वाटलं ,बरंच.... काही शिकवणारा होता हा प्रवास. आता नवीन घर नवीन जबाबदारी आणि खुप आनंद," असं कॅप्शन देत कृतिकाने तिच्या नवीन घराची गुडन्यूज दिली आहे. दरम्यान, कृतिकाने बोरीवलीमध्ये तिचं स्वत:चं घर घेतलं आहे. कृतिकाने रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे ती प्रचंड प्रकाशझोतात आली.