लतिका अन् तिच्या वडिलांचा भन्नाट डान्स पाहिलात का? कच्चा बादामवर धरला बापलेकीने ताल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 18:00 IST2022-02-20T18:00:00+5:302022-02-20T18:00:00+5:30
Akshaya Naik: कलाविश्वाप्रमाणेच अक्षया सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती येणारा प्रत्येक ट्रेंड फॉलो करत असते.

लतिका अन् तिच्या वडिलांचा भन्नाट डान्स पाहिलात का? कच्चा बादामवर धरला बापलेकीने ताल
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक (akshaya naik). सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेच्या माध्यमातून अक्षया घराघरात पोहोचली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली. या मालिकेत ती लतिका ही भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे पडद्यावर सालस, गुणी असलेली अक्षया खऱ्या आयुष्यात प्रचंड बिंधास्त आणि बोल्ड आहे. अलिकडेच तिने तिच्या वडिलांसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांमध्ये धुमाकूळ घालतोय.
कलाविश्वाप्रमाणेच अक्षया सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती येणारा प्रत्येक ट्रेंड फॉलो करत असते. यामध्येच तिने कच्चा बादाम या गाण्यावरील ट्रेंड फॉलो केला आहे. विशेष म्हणजे तिने आपल्या वडिलांसोबत हा ट्रेंड फॉलो केला आहे. अक्षयाने या दोघांचा डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
दरम्यान, अक्षया सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तिचे काही फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. तसंच अक्षया अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम डान्सरदेखील आहे. अनेकदा ती तिचे डान्स व्हिडीओदेखील शेअर करत असते.