काय होतीस तू काय झालीस तू, मराठमोळ्या अभिनेत्रीचा आधीचा लूक आणि आताचा लूक पाहून तुम्हीही चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 11:10 AM2021-08-14T11:10:00+5:302021-08-14T11:14:06+5:30
पूर्वीच्या काळात लूक आणि सौंदर्याबाबत तितकेसे प्रयोग केले जात नव्हते. मात्र आता अभिनेत्री आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाल्या आहेत.
सोशल मीडियावर थ्रो बॅक फोटोचा ट्रेंड बराच रूढ झाला आहे. थ्रो बॅकच्या माध्यमातून जुने फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला जातो. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा थ्रो बॅक फोटोच्या माध्यमातून जुन्या आठवणी सोशल मीडियावरील आपल्या फॅन्ससह शेअर करतात. याच फोटोद्वारे प्रत्येकजण भूतकाळातील आठवणीत रममाण होतो. असाच एक फोटो अभिनेत्री माधवी निमकरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
माधवीचा हा फोटो पाहून हीच का ती ? असे प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाहीत. माधवी निमकरने सोशल मीडियावर तिचा जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून चाहते आश्चर्यचकीत होत आहे. इतक्या वर्षात तिच्यात झालेला कायापालट पाहून तिचे कौतुकही होत आहे. मुळात अभियनाव्यतिरिक्त माधवी तितकीच फिटनेस फ्रिक आहे.
पूर्वीच्या काळात लूक आणि सौंदर्याबाबत तितकेसे प्रयोग केले जात नव्हते. मात्र आता या अभिनेत्री आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाल्या आहेत. त्यामुळेच त्या आधीपेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत.
त्यांच्या आधीच्या फोटोंवर नजर टाकली तर त्यांच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल. अगदी माधवीचा हा फोटो पाहून तिच्यात झालेला बदल पाहून तिने घेतलेली मेहनतही समजते.
फिट राहण्यासाठी माधवी नियमित योगा करते. माधवीच्या फिट राहण्यामध्ये योगविद्येचे मोलाचे योगदान असून ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील तिच्या योगा पोझेस मधील फोटोज तिच्या चाहत्यांसाठी शेअर करते.रिअल लाइफमध्ये माधवी तितकीच ग्लॅमरस, स्टायलिश असल्योसोबतच मनमौजी आहे.
सोशल मीडियावर माधवी निमकर प्रचंड सक्रीय असते.आपल्या अभिनयाप्रमाणे घायाळ करणाऱ्या सौंदर्यानेही तिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.नेहमीच तिच्या ग्लॅमरस अदा रसिकांना क्लीन बोल्ड करतात. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हिडीओ शेअर करत रसिकांचीही वाहवा मिळत असते.
प्रत्येक स्टाईल तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. त्यामुळे तिची प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस नेहमीच पात्र ठरतो.ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन दोन्ही लूकला चाहते विशेष पसंती देताना दिसतात.