'ये कहाँ आ गए हम'; ऑस्ट्रेलिया टूरवर गेलेल्या मधुराणीचा हटके व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 19:45 IST2023-05-24T19:44:25+5:302023-05-24T19:45:01+5:30
Madhurani gokhale prabhulkar: मधुराणीने मालिकेतून काही दिवसांचा ब्रेक घेतला असून ती तिच्या लेकीसोबत ऑस्ट्रेलिया टूरवर गेली आहे.

'ये कहाँ आ गए हम'; ऑस्ट्रेलिया टूरवर गेलेल्या मधुराणीचा हटके व्हिडीओ
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर(Madhurani gokhale-prabhulkar). 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत मधुराणी, अरुंधती ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. त्यामुळे आज घराघरात ती लोकप्रिय झाली आहे. मधुराणीने या मालिकेतून काही दिवसांचा ब्रेक घेतला असून ती तिच्या लेकीसोबत ऑस्ट्रेलिया टूरवर गेली आहे.
सध्या सोशल मीडियावर मधुराणीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती ऑस्ट्रेलियातील काही ठराविक जागी भटकंती करत आहे. यामध्येच तिने सिडनीतील रेनफॉरेस्टला भेट दिली. यावेळचा एक छानसा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
दरम्यान, मधुराणीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती एका ब्रीजवरुन जात आहे, सोबतच व्हिडीओच्या बँकग्राऊंडला ये कहाँ आ गए हम.. असं गाणं प्ले होतंय. त्यामुळे हा व्हिडीओ आणखीनच छान वाटतोय. मधुराणीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तिला लवकर मालिकेत परत अशी विनंतीही केली आहे.