"बोल्ड सीनच्या नावाखाली काहीही करायला सांगाल तर..." मृणाल दुसानीसचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 03:12 PM2024-05-31T15:12:56+5:302024-05-31T15:13:21+5:30

बोल्ड सीन्स करणार की नाही? या प्रश्नावर मृणाल दुसानिसने लोकमत फिल्मशी बोलताना मौैन सोडलंय (mrunal dusanis)

marathi actress mrunal dusanis talk about she doing bold scenes in serials or not | "बोल्ड सीनच्या नावाखाली काहीही करायला सांगाल तर..." मृणाल दुसानीसचं मोठं वक्तव्य

"बोल्ड सीनच्या नावाखाली काहीही करायला सांगाल तर..." मृणाल दुसानीसचं मोठं वक्तव्य

मृणाल दुसानिस ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. मृणालने 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तू तिथे मी', 'हे मन बावरे', 'अस्सं सासर सुरेख बाई' अशा मालिकांमध्ये अभिनय करुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. मृणाल गेली अनेक वर्ष अमेरिकेत होती. तरीही मृणालचे चाहते तिला मिस करत होते. आता मृणाल पुन्हा भारतात आली. यानिमित्त मृणालने लोकमत फिल्मीशी खास बातचीत केली. त्यावेळी तिने बोल्ड सीन करणार की नाही? या विषयावर मोठं वक्तव्य केलंय.

"बोल्ड सीन्स करायला हरकत नाही पण..." : मृणाल दुसानिस

मृणालने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत बातचीत करताना म्हटलं की, "कसं होतं ना.. तुम्ही कलाकृतींमध्ये एखादी व्यक्तिरेखा साकारता तेव्हा लोकांना वाटतं की, ती अभिनेत्री वैयक्तिक आयुष्यात तशीच आहे. म्हणजे मी बोल्ड सीन्स करायला तयार आहे असं नाही. मला असं वाटतं की, कोणतीही गोष्ट एका सभ्यतेने दाखवणं सोप्प असतं. याशिवाय गोष्टी सभ्यतेने लोकांना दाखवणं जमतं आणि ते जमायला पाहिजे. त्यामुळे बोल्ड सीन्स एका सभ्यतेच्या मर्यादेत दाखवले जाणार असतील आणि त्या कथेची गरज असेल तर कलाकार या नात्याने तुम्हाला करायला काहीच हरकत नाही."

"उगाच काहीही करायला सांगाल तर..." : मृणाल दुसानिस

मृणाल पुढे म्हणाली, "कलाकार म्हणून तुमच्या कामात आणि वागण्या-बोलण्यात शिस्त असायलाच पाहिजे. त्यामुळे एवढी कडक शिस्तीची मी नक्कीच आहे. मला वाटतं की, जे अगदी सभ्यतेच्या चौकटीत दाखवलं जाईल याशिवाय ते सीन्स करणं गरजेचंच असेल तर माझा काही आक्षेप नाही. पण बोल्ड सीन्सच्या नावाखाली उगाचच काहीतरी करायला तेव्हढी मी कम्फटेर्बल नाही. अशावेळी स्पष्टपणे नकार द्यायला मला काही प्रॉब्लेम नाही." अमेरिकेतून परतल्यावर मृणाल लवकरच मालिकांमधून भेटीला येईल अशी तिच्या चाहत्यांना आशा आहे.

Web Title: marathi actress mrunal dusanis talk about she doing bold scenes in serials or not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.